"तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा...", पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:30 PM2022-03-08T15:30:53+5:302022-03-08T15:31:29+5:30
Sanjay Raut : आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केले आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार असून या परिषदेत कोणाला टार्गेट करतील याविषयी तर्क लावले जात आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
"तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा... हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में... अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा... आज 4 बजे, शिवसेना भवन", असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केले आहे.
महाविकास आघाडी सरकारवर आरोप करुन स्वत: नामनिराळे राहणाऱ्या भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे उघडे पाडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत भाजपाच्या नेमक्या कोणत्या नेत्यांबाबत गौप्यस्फोट करणार आहेत, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2022
हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में
अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा..
आज 4 बजे
शिवसेना भवन pic.twitter.com/REvdDeBGED
याआधी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर आरोप केले होते. तसेच, भाजपा नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवले होते. किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना तुरुंगात टाकणार असल्याचेही संजय राऊत यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. तसेच मोहित कंबोज यांच्यावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरू होता. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात आणि त्यांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.