Sanjay Raut : "मला अटक करा, फाशी द्या, गोळ्या घाला... मैं झुकेगा नहीं साला"; संजय राऊतांचं रोखठोक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:59 PM2023-01-04T13:59:54+5:302023-01-04T14:09:10+5:30
Sanjay Raut And Deepak Kesarkar : संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांना शिंदे गटाचे आमदार, नेते आणि प्रवक्तेही प्रत्युत्तर देतात. नुकतेच मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर, आता संजय राऊत यांनी केसरकरांना थेट इशारा दिला 2024 ला केसरकरांनीच तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असे राऊत यांनी म्हटले. यानंतर आता राऊतांनी रोखठोक ट्विट केलं आहे. "मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला, मी पुन्हा सांगतो, मैं झुकेगा नहीं साला!" असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे. "शिंदे गँगच्या दीपक केसरकरांकडून मला धमकी देण्यात येत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे या धमक्यांकडे लक्ष देतील अशी आशा आहे. मिस्टर केसरकर, मला अटक करा, मला फाशी द्या किंवा मला गोळ्या घाला... मी पुन्हा सांगतोय, मैं झुकेगा नहीं साला!" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Deepak Kesarkar frm Shinde Gang is threatening to put me bhind bars.I hope @AmitShah & @Dev_Fadnavis r watching these brazen threats!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2023
Does he think tht Law can Dance like a nautch girl to his tunes?
Mr Kesarkar,
Arrest me,hang me or Shoot me, I repeat,Main jhukega nahi Sala!
"संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय? न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे? खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे? हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2023
न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ?
खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे?हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका. @Dev_Fadnavispic.twitter.com/ksvez5HWa5
संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी तुरूंगात जाऊ, आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत, तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, तुम्ही म्हणजे कायदा नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकरांवर पलटवार केला. तसेच, केसरकर खरंच असं बोलले असतील तर 2024 ला त्यांनी तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत, त्याबद्दल संजय राऊत यांना विचारल असता, योगी मुंबईत येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. पण त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा जावं, असेही त्यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"