Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीबाबत दिल्लीहून महत्त्वाचे आदेश; शिंदे गटाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 05:03 PM2023-05-07T17:03:15+5:302023-05-07T17:04:57+5:30

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट कोणत्या जागा लढवणार याबाबत दिल्लीतून निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

sanjay shirsat informed about an important order came from delhi over bjp and shiv sena shinde group alliance in lok sabha election 2024 | Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीबाबत दिल्लीहून महत्त्वाचे आदेश; शिंदे गटाचा मोठा खुलासा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीबाबत दिल्लीहून महत्त्वाचे आदेश; शिंदे गटाचा मोठा खुलासा

googlenewsNext

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांसाठी हळूहळू सर्व पक्षांची तयारी मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे. एकीकडे भाजप पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नात असून, दुसरीकडे भाजपविरोधक पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून राज्यातील भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीबाबत महत्त्वाचे आदेश दिले असल्याची माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. 

शिंदे गटाचे नेते लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत कोणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरु असतानाच, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा शिवसेना, भाजप युतीने लढायच्या असून, यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. कोणाला कोणती जागा याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसे आदेश दिल्लीहून आल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.

दिल्लीतून भाजप-शिंदे गटासाठी मोठे आदेश

महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा शिवसेना, भाजप युतीने मजबुतीने लढायच्या आहेत, असा दिल्लीचा आदेश असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे होती. त्यामुळे ती पुन्हा आमच्याकडे राहणार यासाठी आमचा प्रयत्न असणार असणार आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा सर्वेक्षणानंतर ही सीट कोण जिंकू शकेल, याचा अंदाज आल्यानंतर त्या पक्षाला आणि नेत्याला उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या जागेवरून कोणताही वाद वैगरे आमच्यात नाही, असेही शिरसाट म्हणाले. 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा केंद्रीय मंत्री भागवत कराड लढवणार की, रोहयो मंत्री संदिपान भुमरे लढवणार किंवा आणखी तिसरा कोण असणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. अजून कोणाचेही नाव घोषित झाले नसून, सध्यातरी कोणी उमेदवार नाही, असे शिरसाट यांनी सांगितले. तसेच मला लोकसभा निवडणुकीत उभे रहाण्याचे सांगितल्यास मी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले. 
 

Web Title: sanjay shirsat informed about an important order came from delhi over bjp and shiv sena shinde group alliance in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.