नाट्यसृष्टीला मिळावी पुन्हा एकदा संजीवनी

By admin | Published: November 5, 2016 01:11 AM2016-11-05T01:11:45+5:302016-11-05T01:11:45+5:30

उद्या मराठी रंगभूमी १७३ वर्षांची होत आहे. त्यानिमित्त नाट्यक्षेत्रातील जुन्या नव्या मंडळींनी एकत्र यावे.

Sanjivani once again gets the theatrical release | नाट्यसृष्टीला मिळावी पुन्हा एकदा संजीवनी

नाट्यसृष्टीला मिळावी पुन्हा एकदा संजीवनी

Next


इंदापूर : उद्या मराठी रंगभूमी १७३ वर्षांची होत आहे. त्यानिमित्त नाट्यक्षेत्रातील जुन्या नव्या मंडळींनी एकत्र यावे. इंदापूरमधील तब्बल २४ वर्षांपासून मरगळलेल्या अवस्थेत असणाऱ्या नाट्यसृष्टीला नवसंजीवनी द्यावी,अशी अपेक्षा नाट्यक्षेत्रातील जाणते व्यक्तीमत्व किरण जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले की, दि. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे ह्यसीता स्वयंवरह्ण या नाटकाच्या निमित्ताने दिवंगत विष्णुदास भावे यांनी मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला आत्ता १७३ वर्षे पूर्ण होत आहेत.इंदापूरला नाट्यक्षेत्राची ९६ वर्षांची परंपरा आहे.सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाल्यानंतर त्यातील मेळ्यांच्या निमित्ताने इंदापूरकरांमध्ये नाट्यसृष्टीस पोषक वातावरण निर्माण झाले. सन १९४० पासून त्याने बळकटी धरली.मुबारक शेख, भारत तारगावकर, लक्ष्मण बाब्रस, अजोतीकर भगिनी, डॉ.बबन काकडे,बबन शेटे,सुहास जौंजाळ,दत्ता कुंभार, मोहन राऊत, सईद मुलाणी ही शहराच्या नाट्यक्षेत्रातील काही ठळक नावे.नाट्यसंदेश ही आवर्जून उल्लेख करण्यासारख्या नाट्यसंस्थेत आमची जडणघडण झाली.
नाट्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माज्या सहकाऱ्यांनी उत्तमोत्तम कलाकृती सादर करताना मनोरंजनाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यात, शाळा विद्यालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे.
>सन १९९२ मध्ये ‘निष्पाप’सारखे
नाटक सादर केल्यानंतर इंदापुरातील नाट्यचळवळ थंडावलेली आहे. मरगळ झटकून टाकण्यासाठी नव्या जुन्या नाट्यप्रेमींनी एकत्रित यावे. प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

Web Title: Sanjivani once again gets the theatrical release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.