औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी!

By Admin | Published: September 7, 2014 02:10 AM2014-09-07T02:10:39+5:302014-09-07T02:10:39+5:30

हासाच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींना बुलडाणा जिल्ह्यात संजीवनी लाभली आहे.

Sanjivani to pulse herbs! | औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी!

औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी!

googlenewsNext
दहा वन ग्राममधील 25क् हेक्टरवर प्रयोग : 2 लाख 75 हजार वनौषधींची लागवड
खामगाव (जि़ बुलडाणा) : :हासाच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींना बुलडाणा जिल्ह्यात संजीवनी लाभली आहे. :हास पाऊ लागलेल्या औषधी वनस्पतींच्या लागवड आणि संगोपनासाठी बुलडाणा जिल्ह्यातील दहा वनग्रामांची निवड करण्यात आली आहे.  यासाठी या वनग्रामांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुव्रेदिक मंडळाच्या वतीने प्रत्येकी 5 लाख 67 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 
गत काही वर्षात बुलडाणा जिल्हा वन संवर्धनात अग्रेसर राहिला आहे. शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अमरावती वन परिक्षेत्रत बुलडाणा जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता जिल्ह्यातील दहा वनग्रामांची राष्ट्रीय आयुव्रेदिक औषधी महामंडळाकडून औषधी रोपवन लागवडीसाठी निवड झाली आहे. या दहा वन ग्रामांमध्ये 25क् हेक्टरवर 2 लक्ष 75 हजार औषधी वृक्ष रोपटय़ांची लागवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
 
या वनस्पतींची लागवड
अडुळसा, शतावरी, तुळस, अश्वगंधा, आवळा, हिरडा, बेहडा, नीम, करंज, बिबा, अजरुन, मुरडशेंग, मुश्कंद, पुत्रजिवा, कांचन, शिकेकाई, निगरुडी कड आदी औषधी वनस्पती आणि औषधी वृक्षांची लागवड केली जात आहे. या वनस्पतींची रोपटी औरंगाबाद, जळगाव, हिंगणघाट, अमरावती, नागपूर येथून आणण्यात आली आहेत.
 
:हास पावू लागलेल्या औषधी वनस्पती व वृक्षांचे संगोपन करण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. औषधी रोपवनासाठी अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याची निवड झाली आहे.
- शिवाजी दहीवाल, वन परिक्षेत्र अधिकारी, खामगाव, जि. बुलडाणा
 
बहुपयोगी औषधी वनस्पतींचे जतन
गेल्या काही वर्षात वृक्षतोड आणि जंगलांच्या हानीमुळे अनेक वनौषधी :हास पावत आहेत; मात्र विविध औषधी वनस्पतींचे जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनातर्फे  हाती घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय आयुव्रेदिक मंडळाकडून औषधी रोपवनासाठी वन ग्रामातील 25 हेक्टर वन परिक्षेत्रत  लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून, प्रत्येक वन ग्रामामध्ये 27 हजार 5क्क् वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.

 

Web Title: Sanjivani to pulse herbs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.