शंकरपटाच्या २७ आयोजकांवर गुन्हे दाखल

By admin | Published: January 16, 2015 11:55 PM2015-01-16T23:55:39+5:302015-01-16T23:55:39+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

Sankarpata's 27 organizers have filed criminal cases against them | शंकरपटाच्या २७ आयोजकांवर गुन्हे दाखल

शंकरपटाच्या २७ आयोजकांवर गुन्हे दाखल

Next

धामणगाव बढे (बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशनअतंर्गत येत असलेल्या कुर्‍हा (गोतमारा) येथे विनापरवाना शंकरपट आयोजित केल्याप्रकरणी २७ आयोजकांवर धामणगाव बढे पोलिसांनी १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. मोताळा तालुक्यातील कुर्‍हा (गोतमारा) शिवारात विनापरवाना शंकरपटाचे आयोजन केल्याची माहिती धामणगाव बढे पोलिसांना १५ जानेवारी रोजी मिळाली. या माहितीच्या आधारे धामणगाव बढेचे ठाणेदार वानखेडे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी विनापरवाना शंकरपटाचे आयोजन केल्याचे, तसेच बैलांना आरी टोचून शर्यतीला जुंपल्याचे दिसले. पोलीसांनी शंकरपट लगेचच थांबवून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आयोजकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी प्राण्यांना निर्दयी वागवण्याचा प्रतिबंधक नियम १९६0 नुसार कलम १८८/२८९ अन्वये भगवान मछळे, दयाराम मछळे, मुंगरीवाले, ङ्म्रावण मछळे, प्रदीप घोती, विनोद झाडे, मनोज घोती, शेनसिंग साबळे, रमेश पेळे, भोपाळ मंझा, भारत आझडे, रामनाथ साबळे, भगवान महाराज, शिवसिंग रबडे, जयसिंग मंझा, गोपाल आझडे, मनोहर सोनोने, मोतेसिंग तघरे, दिलीप मछळे, अर्जून घोती, अशोक पडवाळ, भास्कर गायकवाड, शे.असलम खान, देवराव जाधव, प्रल्हादभाऊ राठी, पुरूषोत्तम आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sankarpata's 27 organizers have filed criminal cases against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.