माउलींच्या पालखीचे ११ जूनला होणार प्रस्थान; यंदा लोणंदमध्ये दोन दिवस मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:35 AM2023-04-13T07:35:31+5:302023-04-13T07:36:02+5:30

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती

sant dnyaneshwar palkhi on June 11 This year stay in Lonand for two days | माउलींच्या पालखीचे ११ जूनला होणार प्रस्थान; यंदा लोणंदमध्ये दोन दिवस मुक्काम

माउलींच्या पालखीचे ११ जूनला होणार प्रस्थान; यंदा लोणंदमध्ये दोन दिवस मुक्काम

googlenewsNext

आळंदी :

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

प्रथा-परंपरेनुसार रविवार, दि. ११ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत-गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. १२ व १३ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि. १४ व १५ सासवड, त्यानंतर १६ जेजुरी, १७ वाल्हे, १८ व १९ जूनला सोहळा लोणंद येथे मुक्कामी असेल. 

लोणंदमधून २० रोजी निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण करून पालखी मुक्कामासाठी तरडगावला असेल. २१ जूनला फलटण, २२ रोजी बरड, २३ नातेपुते मुक्कामी असेल.  २४ रोजी पुरंदावडे येथे गोल रिंगण करून माळशिरसला मुक्कामी जाईल. २५ रोजी पानीव येथे गोल रिंगण करून वेळापूर मुक्काम तर  २६ रोजी ठाकूर बुवाच्या समाधीजवळ गोल रिंगण करून भंडीशेगावला मुक्काम असेल. २७ रोजी बाजीरावची विहीर येथे उभे व गोल रिंगण करून सोहळा वाखरी मुक्कामी जाईल. २८ जूनला इसबावी येथे उभे रिंगण करून रात्री सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरला मुक्कामी पोहोचेल. पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा २९ जूनला संपन्न होईल. 

पालखीचा असा असेल परतीचा प्रवास
३ जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा विठ्ठलनगरीत विसावेल. गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी निघून १२ जुलै रोजी आळंदीत पोहचेल. अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

Web Title: sant dnyaneshwar palkhi on June 11 This year stay in Lonand for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.