‘संत एकनाथ पालखी मार्गाचा अडसर दूर करणार’
By admin | Published: January 2, 2017 05:16 AM2017-01-02T05:16:48+5:302017-01-02T05:16:48+5:30
पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठळी दरम्यानचा भीमा नदीवरील पूल येत्या जूनअखेरपर्यंत पूर्ण करून संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गातील अडसर दूर केला जाईल
गुरसाळे (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठळी दरम्यानचा भीमा नदीवरील पूल येत्या जूनअखेरपर्यंत पूर्ण करून संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गातील अडसर दूर केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे पंढरपूरचे कार्यकारी अभियंता एस. एस. बनसोडे यांनी येथे दिले.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठाळी दरम्यान भीमा नदीतून होडीने पैलतीरावर जात होता. त्यामुळे शासनाने व्होळे-कौठाळी दरम्यानच्या पुलाला मंजुरी दिली आहे. नऊ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. व्होळे-कौठाळी पुलाचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. पुलाचे फाउंडेशन करून भीमा नदीपात्रात आठ खांब बांधून पूर्ण झाले आहेत. (वार्ताहर)