संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वारकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 11:31 AM2018-07-13T11:31:51+5:302018-07-13T11:32:05+5:30

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट

sant tukaram was killed says ncp leader jitendra awhad | संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वारकरी संतप्त

संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वारकरी संतप्त

Next

नागपूर: काल सर्व गीता तोंडपाठ असल्याचं सांगत गीतेतील एक श्लोकही पूर्ण म्हणू न शकलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज नव्या वादात सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता, असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. फेसबुक लाईव्हदरम्यान आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर आव्हाड यांनी त्यांचा व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला. 

तुकाराम महाराजांचा खून झाला होता, असं आव्हाड फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आव्हाडांकडून वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आला. आव्हाडांच्या विधानानं भावना दुखावल्याची प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवली. तुकाराम महाराजांबद्दल असं बोलण्याचं धाडस आव्हाडांनी केलंच कसं?, त्यांच्या या विधानाबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवल्या आहेत.

याआधी काल जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना मला गीता तोंडपाठ असल्याचं म्हटलं होतं. यावेळी एका पत्रकारानं त्यांना गीतेतील एक श्लोक म्हणण्यास सांगितलं. मात्र जितेंद्र आव्हाड यांना श्लोक पूर्ण करता आला नाही. याशिवाय त्यांचे अनेक उच्चारदेखील चुकले. यानंतर आव्हाड श्लोक म्हणण्यास सांगणाऱ्या पत्रकारावरच भडकले. तुम्ही नंतर बाजूला या. मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतो, असं आव्हाड म्हणाले.
 

Web Title: sant tukaram was killed says ncp leader jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.