संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, विठ्ठल नगरी दुमदुमली

By admin | Published: July 3, 2017 06:21 PM2017-07-03T18:21:52+5:302017-07-03T18:21:52+5:30

देहू-आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत वाखरी मुक्कामी थांबलेला लाखो भक्तांचा मेळा टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या भक्तीसागरात सामील झाला.

Santhas Palikha falls in Pandharpur, Vitthal Nagari Dumdumali | संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, विठ्ठल नगरी दुमदुमली

संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, विठ्ठल नगरी दुमदुमली

Next

शहाजी फुरडे-पाटील/ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 3 - अनंत तीर्थाचे माहेर असलेल्यापंढरीत कमरेवर हाथ ठेऊन भक्ताची वाट पाहत असलेल्या विठुरायाच्या भेटीसाठी देहू-आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत वाखरी मुक्कामी थांबलेला लाखो भक्तांचा मेळा टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या भक्तीसागरात सामील झाला. पालख्यांचे शहरात आगमन झाल्याने पंढतीत सर्वत्र भक्तीला उधाण आले आहे.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे संत ज्ञानोबा माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. संत मुक्ताबाई व संत गजानन महाराज यांच्या पालख्या नवमीलाच पंढरपूरात दाखल झाल्या होत्या.पालखी मार्गाने  येऊन वाखरी तळावर मुक्कामी थांबलेल्या संतांना नेण्यासाठी मुक्ताबाई संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांच्यासह छोट्या मोठ्या पालख्या वाखरीकडे  माऊली आणि तुकोबांचे नेण्यासाठी आल्या होत्या. वाखरी तळावर सर्व पालख्या असल्याने रात्रभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी1 वाजता पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.

या मार्गावर सर्वात पुढे नामदेव ,मुक्ताबाई,सोपान काका, निवृत्तीनाथ,  त्यानंतर एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज व सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज या क्रमाने पालख्या पंढरपूरकडे निघाल्या.रस्त्याच्या दुतर्फा वारकरी भजनात तल्लीन होऊन झपाझप पावले टाकत होता.या मार्गावर पाहावे तिकडे वारकरीच दिसत होते.

गर्दीमुळे अतिशय संथ गतीने हे सोहळे चालत होते. विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिर विसावा जवळ माऊली आणि संत तुकोबांचे उभे रिंगण पार पडले.अश्वानी दोन फेऱ्या रथाच्या पाठीमागे पर्यंत जाऊन पूर्ण केल्या.रिंगणानंतर दिंड्यातील वारकऱ्यांनी फुगड्या, मनोरे आदी खेळ खेळत असताना रंग पंचमीप्रमाणे वारकरी एकमेकांना  अंगावर पाणी टाकून बुक्का, गुलाल, अष्टगंध लावत होते. पंढरी समीप आल्याने वारकरी आनंदी होते. आरती म्हटल्या नंतर सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झालं.वाटेत नगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

गेल्या सतरा दिवसापासून या पालखी सोहळ्यात लहान थोर, आबालवृद्ध,केवळ पांडुरंगाच्या भेटीसाठी चालत होते हा सर्व वारकऱ्यांचा मेळा रात्री पंढरपुरात दाखल झाला. त्यामुळे पंढरी दुमदुमून गेली होती. माऊलींची पालखी प्रदक्षिणा मार्गे समाधी मंदिरात विसावली तर तुकाराम महाराज यांची ही याच मार्गे येऊन तुकाराम मंदिरात चार दिवसाच्या मुक्कामासाठी थांबली. एकनाथ महाराजां ची नाथ चौकात, थांबणार आहे.सर्व संताच्या पालख्या आपापल्या मठात थांबल्या आहेत.

तुकोबांसमोर दैठणकरांचे तर माऊली समोर देहूकरांची कीर्तन सेवा
रविवारी तुकोबांसमोर ठाकुरबुवा दैठणकर यांचे कीर्तन  तर नवी पेठ विठ्ठल मंदिर  दिंडी पुणे या 115 वर्षाच्या जुन्या दिंडीचा जागर झाला. तर परंपरे प्रमाणे माऊलींसमोर देहूकरांच्या वतीने संभाजी महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले.

आज नगर प्रदक्षिणा 
सर्व संतांच्या पालख्यासह विविध दिंड्यातील वारकरी चंद्रभागेत स्नान करून, टाळ मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यानंतर अनेक वारकरी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात.

दिंडीतील विणेकऱ्यांचा नारळ व शेंगा देऊन सत्कार
संत तुकारामांचा सोहळा मंदिरात पोहचल्या सर्व दिंड्यातील विणेकऱ्याना मानाचा नारळ प्रसाद व दुसऱ्या दिवशीच्या एकादशी मुळे भुईमुगाच्या शेंगा देऊन सत्कार देहू संस्थान चे अध्यक्ष बाळासाहेब मोरे सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यंदा कोरडी वारी, पाऊसच नाही
यंदा सोहळ्याचे देहूहून प्रस्थान झाल्यापासून केवळ रोटी घाटातील किरकोळ अपवाद वगळता वाटचालीत कोठेही पाऊस पडला नाही त्यामुळे यंदाची वारी ही कोरडीच झाली.त्यामुळे वारकरी पांडुरंगाला केवळ चांगला पाऊस पडू दे असे साकडे घालत होता.

Web Title: Santhas Palikha falls in Pandharpur, Vitthal Nagari Dumdumali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.