संतोष देशमुख हत्याकांडातील आणखी थरकाप उडवणारी माहिती समोर, आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेल्या पाईपचे झाले १५ तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 20:31 IST2025-03-04T20:26:26+5:302025-03-04T20:31:55+5:30
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करताना आरोपींनी त्यांच्या केलेल्या अतोनात छळाचे फोटो समोर आल्यापासून संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संतोष देशमुख हत्याकांडातील आणखी थरकाप उडवणारी माहिती समोर, आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेल्या पाईपचे झाले १५ तुकडे
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करताना आरोपींनी त्यांच्या केलेल्या अतोनात छळाचे फोटो समोर आल्यापासून संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याती थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे. आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना ज्या पाईपने बेदम मारहाण करण्यात आली त्या पाईपचे १५ तुकडे झाल्याचे समोर आले आहे. या पाईपचे तुकडे तपास यंत्रणांच्या हाती लागले असून, ते पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आल्यापासून या हत्याकांडादरम्यान, आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्यांबाबत अनेक दावे केले जात होते. मात्र काल संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याची प्रत्यक्ष छायाचित्रे समोर आल्यानंतर पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, या संदर्भातील अनेक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
वाल्मीक कराड म्होरक्या असलेल्या या टोळीने पाइपला करदोड्याने मूठ तयार करून मारहाण केली. तसेच, एका लोखंडी पाइपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली. या पुराव्यांसह सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत. दरम्यान, संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी अमानूष मारहाण करताना आरोपी आनंद व्यक्त करत असल्याचं फोटोंमधून दिसत आहे.आरोपींपैकी एकजण संतोष देशमुख यांच्या मृतदेहासोबत फोटो काढत हसत असल्याचे समोर आलेल्या फोटोंमधून दिसत आहे.