संतोष देशमुख हत्या: "उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये"; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 20:54 IST2025-01-01T20:52:49+5:302025-01-01T20:54:58+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

संतोष देशमुख हत्या: "उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये"; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Santosh Deshmukh Ujjwal Nikam: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी उज्ज्वल निकम यांची मागणी केली आहे. तसे पत्र धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत आमदार धस यांनी याबद्दल भाष्य केले.
हे देवेंद्र फडणवीसांना बिलकूल आवडलेलं नाहीये -सुरेश धस
सुरेश धस म्हणाले, "मला देवेंद्र फडणवीस मला का थांबवतील? संतोष देशमुख प्रकरणात मी जेवढ्या मागण्या केल्या आहेत, तेवढ्या मंजूर केल्या आहेत. त्यांना (देवेंद्र फडणवीस) आवडलेलं नाहीये हे. मी हे स्पष्टपणे बोलतो. ज्या अर्थी त्यांनी मला थांबवलेलं नाही, देवेंद्रजींना हे बिलकूल आवडलेलं नाही", असे त्यांनी सांगितले.
सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, "ते सकारात्मकपणे काम करताहेत. पोलीस महानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्याकडे चौकशी नसावी, अशी माझी मागणी होती. त्यांनी एसआयटी स्थापन केली. आतापर्यंत हत्येच्या कोणत्या गुन्ह्यात सरकारची मदत झालेली आहे? पहिल्यांदा मदत जाहीर करण्यात आली."
'उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये'
"मकोका लावण्याची मागणी माझीच आहे. त्यांनी सभागृहात जाहीर केले की मकोका लावण्यात येईल. हे एवढं सोपं नाहीये, कोणी पण असं उत्तर देत नाही. फार विचारांती त्या माणसाने उत्तर दिले असेल ना. विचारांती निर्णय दिला", असे आमदार सुरेश धस म्हणाले.
"मी अमूक अमूक सरकारी वकील या लोकांचा जामीन होऊ नये म्हणून आदेश काढण्याची मागणी केली. लगेच बाळासाहेब कोल्हेची नियुक्ती केली. आता आणखी एक पत्र दिलेलं आहे. उज्ज्वल निकम यांची मागणी केलेली आहे. लगेच बाहेर बोलणे उचित नाही,कारण त्यासंदर्भात भेटण्यासाठीच मी थांबलोय. कॅबिनेटच्या बैठकीनंतर फडणवीसांना भेटेन", असे धस यांनी सांगितले.