नऊ निष्पापांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:49 AM2019-01-10T05:49:02+5:302019-01-10T05:49:40+5:30

सुप्रीम कोर्टाची दया; फाशी रद्द करून जन्मठेप

Santosh Maneela who sacrificed nine innocent people | नऊ निष्पापांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला जीवदान

नऊ निष्पापांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला जीवदान

Next

मुंबई : पुण्याच्या स्वारगेट डेपोची बस पळवून तिच्याखाली चिरडून नऊ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाºया संतोष मारुती माने या एसटी ड्रायव्हरला खालच्या न्यायालयांनी ठोठावलेली फाशीची शिक्षा अपिलात रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

त्याच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम केली होती. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१५ मध्ये फाशीला स्थगिती दिली. अपिलाच्या सुनावणीनंतर न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने वरील निकाल दिला. माने याने केलेले गुन्हे भयंकर व निंदनीय असले तरी ज्यासाठी फक्त देहदंड हीच शिक्षा असू शकते अशा विरळात विरळा वर्गात मोडणारे ते नाहीत, असे त्यांनी नमूद केले. माने याने हे कृत्य वेडाच्या भरात केले होते. त्यास भादंविच्या ८४ कलमान्वये निर्दोष मुक्त करावे, हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. माने याच्यासाठी अ‍ॅड.अमोल चितळे व अ‍ॅड. प्रज्ञा बघेल यांनी तर राज्य सरकारसाठी अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर व अ‍ॅड. दीपा कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. फेब्रुवारी २०१४ मध्ये मानेने केलेले अपील अंतिम सुनावणीसाठी लागण्यास ६ डिसेंबर २0१८ उजाडला. तीन तारखांना अपिलावर सुनावणी झाली.

रागाच्या भरात केले कृत्य
संतोष माने हा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा आहे. संतोष स्वारगेट डेपोत ड्रायव्हर म्हणून होता. २५ जानेवारी २०१२ रोजी रात्रपाळीऐवजी दिवसपाळी देण्याची सहाय्यक वाहतूक नियंत्रकांना त्याने विनंती केली. ती अमान्य झाल्यावर तो डेपोतील बसमध्ये चढला. ती बस बेदरकारपणे चालवित रस्त्यावर आणली. पुढील ४५ मिनिटांत मानेच्या या बसखाली चिरडून नऊ नागरिक ठार व ३६ जण जखमी झाले.

Web Title: Santosh Maneela who sacrificed nine innocent people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.