खारघरमध्ये सप्तसुरांनी गाजली पहाट

By Admin | Published: October 31, 2016 03:18 AM2016-10-31T03:18:23+5:302016-10-31T03:18:23+5:30

दिवाळी पहाट हा कार्यक्र म खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करून देतो.

Saptasur dawn in Kharghar | खारघरमध्ये सप्तसुरांनी गाजली पहाट

खारघरमध्ये सप्तसुरांनी गाजली पहाट

googlenewsNext


पनवेल : दिवाळी सण म्हटले की पणत्या , रोषणाई, फराळ आलेच. याव्यतिरिक्त दिवाळी पहाट हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करून देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते. खारघरमधील रांजणपाडा गावात दिवाळी पहाट कार्यक्र माचे आयोजन उमेश चौधरी यांनी केले होते. यावेळी भारतरत्न भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी यांनी आपल्या जादूई सुरांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले. यावेळी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, संगीत क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्र मात शहनाई वादक सुभाष सातारकर यांनी विविधरंगी कलाविष्कार सादर केले. मंगेश चौधरी, अक्षय चौधरी, श्रुती पाटील आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमात वैद्यकीय सेवेत विशेष योगदान देणाऱ्या डॉ. गिरीश गुणे यांचा सत्कार यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व रायगड भूषण निवृत्तीबुवा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमामध्ये मच्छिंद्र पाटील लिखित स्वच्छ भारत अभियानावर आधारित गीताचे प्रकाशन देखील करण्यात आले.
>खोपोलीत रसिकांना मेजवानी
खोपोली : पंडित मुकूंद मराठे, बकुळ पंडीत व सुरभ कु लकर्णी यांनी गायलेल्या, हे सुरांनो चंद्र व्हा, विकल मन आज, दिन गेले भजनाविना सारे, देवाघरचे ज्ञात कोणाला, गुंतता हृदय हे, उगवला चंद्र पुनवेचा यासारख्या खोपोलीकरांची दिवाळी पहाट सुरमयी झाली. खोपोली ब्राम्हण सभेच्या वतीने नव्यानेच बांधलेल्या नाट्यगृहात दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पंचतुंड नर रुंद मालघर’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बकुळ पंडीत यांनी उगवला चंद्र पुनवेचा, सजणा का धरिला परदेस, विकल मन आज झुरत असहाय, प्रभात समयो पातला या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले तर सुरभ कुलकर्णी यांनी हे सुरांनो चंद्र व्हा, तारिणी नववसन धारिणी या गीतांनी रसिकाची मने जिंकली. पंडीत विश्वनाथ कान्हेरे यांनी संवादिनीवर बगळ्यांची माळ फुले व अमृताहुनी गोड ही गाणी वाजवून श्रोत्यांची मने जिंकली.
>वेदमाता मंदिरात कार्यक्रम
कर्जत : कर्जतच्या टेकडीवर असलेल्या वेदमाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. भावगीते, भक्तीगीते, अभंग, शास्त्रीय संगीत मैफिलीने कर्जतकर मंत्रमुग्ध झाले. वेदमाता मंदिराच्या प्रांगणात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष संदीप कर्णुक आणि मधुकर शेलवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संयोजक रायगड भुषण भरत बडेकर यांनी गणेश वंदनेने संगीत मैफिलीचा शुभारंभ केला. वक्र तुंड महाकाय..., तू सुखकर्ता..., तिन्ही लोक आनंदाने..., उठा उठा हो सूर्य नारायणा..., उठी उठी गोपाळा..., आली माझ्या घरी ही दिवाळी... अशा एका पेक्षा एक सरस गीते ओमकार आलम, प्रणिल पवार, अंकिता पष्टे, काजल सुरोशे यांनी सादर केली. त्यांना मंगेश बडेकर, रु पेश कर्णुक यांनी मृदुंगावर, प्रविण पाटील, धैवत देशमुख यांनी तबल्यावर, जयेश बडेकर यांनी हार्मोनियमवर साथ दिली.

Web Title: Saptasur dawn in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.