सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले

By Admin | Published: May 25, 2016 04:00 PM2016-05-25T16:00:57+5:302016-05-25T16:00:57+5:30

या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना थिरकायला लावलं.

Saraat Zangat: The Bombay Theater Dainale in New York | सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले

सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले

googlenewsNext
>आप्पासाहेब पाटील, सोलापूर
झिंग...झिंग...झिंगाट, वेड लागलं... या गाण्यांनी मराठी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरुढ झालेल्या आणि सोलापूरच्या मातीचा सुगंध दरवळणार्‍या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने अवघ्या भारतीयांना वेड लावलं आहे. बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडणार्‍या या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना थिरकायला लावलं. सोलापूरच्या कला क्षेत्राचा हा अटकेपार झेंडा सोलापूरकरांची शान राखणारा ठरला आहे. 
न्यूयॉर्क येथील बॉम्बे थिएटरमध्ये महाराष्ट्र मंडळ आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बॉम्बे थिएटर येथे सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मराठी रसिक प्रेक्षकांनी सैराट चित्रपटातील सर्वच गाण्यांवर झिंगाट होऊन चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले.
उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावण्याबरोबरच वास्तवतेचं भान राखायला लावणार्‍या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आजही महाराष्ट्रातील चित्रपटगृहात सैराटचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. फँड्रीच्या यशानंतर नावारूपाला आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधून पुन्हा माणसाच्या आत्मसन्मानाची गोष्ट सांगितली आहे. परशा आणि आर्चीच्या अल्लड निखळ प्रेमाच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला सामाजिक भवताल देशभरातील प्रेक्षकांना भावतो आहे. विशेष म्हणजे चित्रपट पाहताना प्रत्येकाला जणू ती आपल्याच आजूबाजूची घटना पाहतोय, अशी भावना होते. याशिवाय अजय-अतुल यांच्या संगीताच्या ठेक्यावर थिरकायला लावणार्‍या गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. 
यात लय भारी, नटसम्राट, बालक पालक, टाईमपास, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांच्या उत्पन्नाची खूप चर्चा झाली. सैराटने मात्र या चित्रपटांच्या उत्पन्नाचे सर्व आकडे ओलांडले आहेत. सर्वोच्च उत्पन्न झालेला मराठी चित्रपट ठरण्याचा मान सैराटला मिळाला आहे.
 
 
गुरुवारी दुबईत सैराटचा शो
 
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट चित्रपट गुरूवार, २६ मे रोजी दुबई येथील थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. सोलापूरच्या मातीत चित्रीत झालेला हा चित्रपटाने प्रथमच दुबईसारख्या मोठय़ा शहरात मराठी चित्रपटाने आपले पाय रोवले आहेत.ही बहुमानाची बाब म्हणावी लागेल. या निमित्ताने सोलापूरबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. 
 
ही अभिमानाची गोष्ट
 
जिल्ह्यातील जेऊरचा सुपुत्र नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट दुबईसारख्या ठिकाणी प्रथमच प्रदर्शित होत आहे. दुबईत यापूर्वी नटसम्राट प्रसिध्द झाला होता मात्र तो शाळेत दाखविण्यात आला होता़ मात्र सैराट हा मराठी चित्रपट प्रथमच दुबईच्या सारख्या मोठया शहरातील थिएटरमध्ये लागतोय ही अभिमानाची गोष्ट आहे़.
 
जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकानंही घेतली सैराटची दखल
 
आर्ची परशाच्या प्रेमकहाणीची साक्षीदार स्थळे

Web Title: Saraat Zangat: The Bombay Theater Dainale in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.