देशातील महापालिकांच्या सारथ्यासाठी ‘सारथी’ सज्ज

By Admin | Published: September 4, 2016 01:12 AM2016-09-04T01:12:30+5:302016-09-04T01:12:30+5:30

महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान, तसेच पारदर्शी व्हावा, नागरी सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने

'Sarathi' ready for the civic polls in the country | देशातील महापालिकांच्या सारथ्यासाठी ‘सारथी’ सज्ज

देशातील महापालिकांच्या सारथ्यासाठी ‘सारथी’ सज्ज

googlenewsNext

-  संजय माने,  पिंपरी-चिंचवड

महापालिका प्रशासनाचा कारभार गतिमान, तसेच पारदर्शी व्हावा, नागरी सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली. देशातील सर्व महापालिकांमध्ये ‘सारथी’ उपक्रम राबवावा, असे आदेश केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे देशातील महापालिकांसाठी हा प्रकल्प सारथ्य करणार आहे.
नळजोडसाठी अर्ज कोठे करायचा? बांधकाम परवाना कसा मिळेल? मिळकतकर कोठे भरायचा? असे नागरी सुविधांसंबंधीचे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतात. त्याची तत्काळ उत्तरे मिळणारी सारथी हेल्पलाइन सुविधा पिंपरी-चिंचवडकरांसाठी प्रभावी सोल्युशन यंत्रणा ठरली. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेला सारथी उपक्रम प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सेतू बनला आहे.
ई-गव्हर्नन्सचा अवलंब करून महापालिकेची विविध कार्यालये संगणकीकरणाने जोडून प्रशासकीय कामकाज गतिमान केले.
त्यानंतर नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली.

२१९ महापालिकांमध्ये ‘सारथी’ होणार कार्यान्वित
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून, त्यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये साकारलेल्या सारथी प्र्रकल्पाचे सादरीकरण केंद्रीय नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा, सहसचिव नीरज मंडलोई यांच्यासमोर झाले. परदेशी यांनी सादरीकरण केलेला सारथी प्रकल्प आवडल्याने केंद्रीय नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव एमपीएस दारा यांनी सर्व राज्याच्या प्रधान सचिवांना सारथी प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले. २२ आॅगस्ट २०१६ला दिलेल्या या आदेशामुळे देशातील
२१९ महापालिकांमध्ये हा प्रकल्प राबविण्याची प्रकिया सुरू होणार आहे.

मोबाइल अ‍ॅपद्वारे सेवा...
मोबाइल अ‍ॅप्स अ‍ॅप्लिकेशनद्वारे महापालिकेशी संबंधित कामे नागरिक घरबसल्या करू शकतील. अशा स्वरूपाचे ‘मोबाइल अ‍ॅप्स’ पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केले असून, मोबाइलच्या क्लिकवर त्यांना सहज माहिती मिळणार आहे. हे या महापालिकेने लोकाभिमुख सेवेसाठी उचललेले पुढचे पाऊल आहे.

Web Title: 'Sarathi' ready for the civic polls in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.