पथदिव्यांचे बिल न भरल्यास सरपंच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 08:53 AM2021-08-18T08:53:22+5:302021-08-18T08:53:47+5:30

यासंदर्भात काही दिरंगाई झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना वित्त नियंत्रक प्रवीण जैन यांनी केल्या आहेत.

Sarpanch is responsible if the street light bill is not paid | पथदिव्यांचे बिल न भरल्यास सरपंच जबाबदार

पथदिव्यांचे बिल न भरल्यास सरपंच जबाबदार

Next

- आशिष देरकर

कोरपना (जि. चंद्रपूर) : स्वनिधी व १५ वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील विजेच्या दिव्यांचे बिल भरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. 
तूर्तास ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू बिलाचा भरणा स्वनिधीतून करावा. त्यासंदर्भात काही दिरंगाई झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना वित्त नियंत्रक प्रवीण जैन यांनी केल्या आहेत.

स्वनिधीत ठणठणाट
२०२० व २०२१ या दोन्हीवर्षी ऐन मार्चमध्ये कोरोनाने डोके वर काढल्याने संचारबंदीमुळे ग्रामपंचायतींची करवसुली होऊ शकली नाही. ग्रामपंचायतींचे लाखो रुपये कर स्वरूपात थकित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या स्वनिधीमध्ये पैशांचा ठणठणाट आहे.

Web Title: Sarpanch is responsible if the street light bill is not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज