महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:07 AM2019-02-01T05:07:27+5:302019-02-01T05:07:53+5:30

सीमावर्ती भागात अतिक्रमण; महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

Sarpanch of Telangana in the villages of Maharashtra | महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

googlenewsNext

- शंकर चव्हाण 

चंद्रपूर : महाराष्ट्र आणितेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या १४ गावांच्या हद्दीचा वाद न सोडविला गेल्यामुळे तेलंगणाचे प्रशासकीय अतिक्रमण वाढू लागले आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या या १४ मराठी भाषिक गावात तेलंगणाने चक्क निवडणुका घेऊन आपले सरपंच निवडले आहेत. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडला.

जिवती तालुक्यातील परमडोली, परमडोली तांडा, महाराजगुडा, कोठा, शंकरलोधी, लेंडीजाळा, लेंडीगुडा, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, मुकादमगुडा, येसापूर, पळसगुडा, भोलापठार ही महसुली गावे महाराष्ट्रात असून सर्वोच्च न्यायालयानेसुध्दा यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी तेलंगण राज्य या गावांवरचा ताबा सोडायला तयार नाही. तेलंगणाच्या या अतिक्रमाबाबत या गावातील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला, सरकारला निवेदने दिली. पण महाराष्ट्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही गावे नेमकी कोणत्या राज्यात, तेलंगणा की महाराष्ट्रात? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

दोन्ही राज्यांचे प्रशासन करते काम
चौदा गावात दोन्ही राज्यांचे प्रशासन काम करते. दोन्ही राज्यातील निवडणुकीत इथल्या ग्रामस्थांना मतदान करावे लागते. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीतही येथे मतदान घेण्यात आले. एकीकडे महाराष्टÑ सरकारचे दुर्लक्ष, तर दुसरीकडे तेलंगण सरकारचे विशेष लक्ष अशा कात्रीत ही गावे अडकली आहेत. तेलंगण सरकार येथे विविध योजना राबवित आहेत.

Web Title: Sarpanch of Telangana in the villages of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.