राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 06:38 AM2022-09-08T06:38:39+5:302022-09-08T06:40:39+5:30

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जागा देय आहेत.

Sarpanch will be directly elected in 1166 villages in 18 districts of the state | राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच

राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच

Next

मुंबई : राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी १४ ऑक्टोबरला होईल. 

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबरला निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुटीमुळे २४ व २५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरला दुपारी तीनपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

मतमोजणी हाेणार १४ ऑक्टोबरला -
मतदान १३ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीनपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबरला होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जागा देय आहेत. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जागा देय आहेत.
 

Web Title: Sarpanch will be directly elected in 1166 villages in 18 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.