सरसंघचालक पाकिस्तानवर प्रहार करणार ?

By admin | Published: October 10, 2016 08:57 PM2016-10-10T20:57:13+5:302016-10-10T20:57:13+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी

Sarsanghchalak will attack Pakistan? | सरसंघचालक पाकिस्तानवर प्रहार करणार ?

सरसंघचालक पाकिस्तानवर प्रहार करणार ?

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि.10 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आर्थिक सेवेचे १९७६ बॅचचे अधिकारी व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. सर्जिकल स्ट्राईकवरून देशातील राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संघाच्या गणवेशात फुलपॅन्टचा समावेश झाल्यानंतरचा हा पहिला विजयादशमी उत्सव राहणार आहे.
हाफपॅन्ट ही संघाच्या गणवेशाची ओळख होती. या वर्षी संघाने गणवेशात बदल केला व हाफपॅन्टची जागा फुलपॅन्टनने घेतली. देशातील बऱ्याच भागात संघ स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसून येत असले तरी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत अद्याप या गणवेशात दिसलेले नाहीत. विजयादशमी उत्सवात ते प्रथमच गणवेशाच्या फुलपॅन्टमध्ये दिसतील. स्वयंसेवकांचे पथसंचलनदेखील फुलपॅन्टमध्येच होणार आहे.

Web Title: Sarsanghchalak will attack Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.