सासवड-जेजुरी निकालावरून फटके

By Admin | Published: December 28, 2016 01:23 AM2016-12-28T01:23:56+5:302016-12-28T01:23:56+5:30

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने कोणाची मस्ती उतरली हे स्पष्ट झाले आहे. सासवड आणि जेजुरीतील जनतेने कोणाला नाकारले हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात

Saswad-Jejuri smashed on the result | सासवड-जेजुरी निकालावरून फटके

सासवड-जेजुरी निकालावरून फटके

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी,  मुंबई
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने कोणाची मस्ती उतरली हे स्पष्ट झाले आहे. सासवड आणि जेजुरीतील जनतेने कोणाला नाकारले हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर पलटवार केला आहे.
पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात मंत्री म्हणून आपल्याला बोलावले नाही. गिरीश बापट यांना माज आलाय, त्यांची मस्ती उतरवायला हवी, अशा शेलक्या शब्दात राज्यमंत्री शिवतारे यांनी बापट यांच्यावर टीका केली होती.
शिवतारे यांच्या टीकेवर ‘लोकमत’शी बोलताना बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यात नगरपरिषदांमध्ये आमचे ८ नगरसेवक होते ज्यांची संख्या आता ५५ ते ६० झाली आहे. आळंदी, लोणावळा, तळेगाव नगरपालिकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकला. बारामतीत पाच नगरसेवक निवडून आणले. शिवतारेंच्या ताब्यात असणाऱ्या सासवड, जेजुरीतही भाजपाचा ध्वज फडकला. राजकीय जीवनात नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, मंत्र्यांनी माज केला किंवा मस्ती दाखवली तर जनताच ही मस्ती उतरवत असते. त्यामुळे या निकालात आमची मस्ती वाढली नाही, पण आमच्या जागा नक्कीच वाढल्या आहेत, असा पुणेरी चिमटाही बापटांनी काढला. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. जनतेने मला सहा वेळा निवडून दिले आहे. त्यामुळे मस्तीची भाषा वापरणाऱ्यांनी जरा अभ्यास करून बोलावे, असेही बापट म्हणाले.
मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पंतप्रधान कार्यालयाने ठरवून दिला होता. त्यात कोणाचे नाव आले आणि कोणाचे नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे. कोणत्या प्रोटोकॉलची माहिती कोणाकडे असते हे राज्यमंत्री असल्याने त्यांना माहिती नसेल, त्या अज्ञानातून त्यांनी हे विधान केले असेल असे सांगत, यावर आपल्याला जास्ती काही बोलायचे नाही, असेही बापट म्हणाले.

शिवतारेंनी केली होती शेलकी टीका
पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात मंत्री म्हणून आपल्याला बोलावले नाही. गिरीश बापट यांना माज आलाय, त्यांची मस्ती उतरवायला हवी, अशा शेलक्या शब्दात राज्यमंत्री शिवतारे यांनी बापट यांच्यावर टीका केली होती.

Web Title: Saswad-Jejuri smashed on the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.