अमरनाथ दर्शनाला गेलेले साताऱ्याचे ३५ यात्रेकरू सुखरूप
By admin | Published: July 11, 2017 10:56 PM2017-07-11T22:56:30+5:302017-07-11T22:56:39+5:30
अमरनाथ यात्रेसाठी साताऱ्याहून गेलेले सर्व ३५ यात्रेकरू सुखरुप आहेत. त्यांची यात्रा श्रीनगरमध्ये थांबविण्यात आली असून
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 11 - अमरनाथ यात्रेसाठी साताऱ्याहून गेलेले सर्व ३५ यात्रेकरू सुखरुप आहेत. त्यांची यात्रा श्रीनगरमध्ये थांबविण्यात आली असून, सैन्यांकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर यात्रेकडून पुढे मार्गस्थ होणार आहेत. त्यांच्या गाडीला सैन्यांचे संरक्षण देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातून अमरनाथ यात्रेसाठी शनिवार, दि. ८ रोजी ३५ जणांची बस रवाना झाली. यामध्ये साताऱ्यातून २५, दहिवडीचे १० ते पुण्यातील २ असे ३५ यात्रेकरू आहेत. साताऱ्यांतील यात्राकरूंच्या गाडीची प्रशासनाकडे नोंदणी असून त्यांना सैन्यांचे संरक्षण दिले आहे. चकमक सुरू झाल्यानंतर ही यात्रा श्रीनगरमध्ये थांबविण्यात आली. तेथेच एक दिवसाचा मुक्काव वाढविला आहे. भारतीय सैन्यांनी हिरवा कंदिल दिल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे.
सर्व प्रवासी संपर्कात
साताऱ्यातून अमरनाथला गेलेल्या सर्व यात्रेकरूंना संरक्षण असल्याने घाबरण्याचे कारण नाही. तसेच सर्व यात्रेकरू नातेवाईकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अमरनाथ यात्रा संयोजिका डॉ. हेमलता हिरवे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.