Satara: एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात

By दीपक शिंदे | Published: June 25, 2023 05:18 AM2023-06-25T05:18:17+5:302023-06-25T05:19:54+5:30

Eknath Shinde: आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली.

Satara: Eknath Shinde's sensitivity, helped a poor old couple in Pimpritamb village | Satara: एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात

Satara: एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, पिंपरीतांब गावातील गरीब वृद्ध दाम्पत्याला दिला मदतीचा हात

googlenewsNext

सातारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दरेकडून मुंबईकडे परतताना त्यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबला. निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते. आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात. पावसाळ्यातील त्यांच्या पोटापाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करतात आणि प्रशासनाला त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देऊन मार्गस्थ होतात.

आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. त्याचवेळी पिंपरीतांब गावातील एका गरीब दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्या मूळ गावी दरे येथे वास्तव्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरेदरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या भेटीला गेले.

पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षांचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणारे कुणीही नसल्याने, आहे त्या तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच राहतात. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार? त्याऐवजी गावाजवळ का राहत नाही, असे त्यांना विचारले. मात्र, त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्नधान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही. त्यामुळे गावाजवळ राहावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्याना केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा आपल्या पदाचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कसा वापर करता येईल, याचाच विचार करतात आणि ते कृतीतून दाखवतात. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील विठ्ठल गोरे यांना मदत करताना त्यांच्यातली हीच संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Web Title: Satara: Eknath Shinde's sensitivity, helped a poor old couple in Pimpritamb village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.