सातारा : शोकाकुल वातावरणात विलास शिंदेंवर झाले अंत्यसंस्कार
By admin | Published: September 1, 2016 07:36 AM2016-09-01T07:36:41+5:302016-09-01T12:56:08+5:30
शोकाकुल वातावरणात साता-यातील शिरगाव येथे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - अत्यंत शोकाकुल वातावरणात साता-यातील शिरगाव येथे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर वाई तालुक्यातील शिरगाव येथे गुरूवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या आठवड्यात दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंचा बुधवारी लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकणे दुर्देवाने वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या जिवावर बेतले. २२ ऑगस्टच्या दुपारी खारमधील एस.व्ही. रोडवरील पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावत होते. दुपारच्या सुमारास विना हेल्मेट भरधाव वेगाने आलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला त्यांनी अडवून त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली.
आणखी वाचा
कागदपत्रे नसल्याने या तरूणांनी शिंदे यांच्याशीहुज्जत घालत त्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. एवढेच नाहीतर त्याने आपल्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. लाकडी बांबू घेऊन तेथे पोहचलेल्या अहमद मोहम्मद अली कुरेशीने (२२) शिंदे यांच्या डोक्यात बांबूचा जोरदार फटका मारल्याने ते जबर जखमी झाले.
आणखी वाचा
फटका वर्मी बसल्याने रक्तबंबाळ होऊन शिंदे रस्त्यावर कोसळले.जखमी अवस्थेतील शिंदे यांना उपचारांसाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालवली. शिंदे यांचे पार्थिव गुरुवारी पहाटे सहावाजता शिरगाव येथे आणण्यात आले. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलिमध्ये शिंदे यांचे पार्थिव ठेवून त्यांच्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रा निघाली. मुलगा दिपेश याने मुख्याग्नी दिला. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलिसांतर्फे विलास शिंदे यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.