कोयना धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 12:09 PM2017-07-29T12:09:11+5:302017-07-29T14:11:04+5:30

satara koyna dam water release | कोयना धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

कोयना धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

Next

पाटण (सातारा), दि. 29 - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.  सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू असून कोयना धरणात एकूण 81.86 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. धरणातील पाणीपातळी राखण्यासाठी शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 8.30 वाजल्यापासून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना पायथा विद्युत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.   


यानंतर सांडव्यावरूनही 1 ऑगष्टपासून पाणी सोडावे लागणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे ज्ञा. आ. बागडे यांनी दिली आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 


मात्र, धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणा-या नागरिकांनी, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, तसेच वीजमोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कण्यात आले आहे.

Web Title: satara koyna dam water release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.