साताऱ्यातही वारसदारच
By admin | Published: February 7, 2017 11:42 PM2017-02-07T23:42:52+5:302017-02-07T23:42:52+5:30
सातारा जिल्ह्यात कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू हृषीकेश शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुडाळ (ता. जावळी) गटातून अर्ज दाखल केला
सचिन जवळकोटे , सातारा
सातारा जिल्ह्यात कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू हृषीकेश शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुडाळ (ता. जावळी) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी तरडगाव (ता. फलटण) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वहिनी शिवांजलीराजे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही सोमवारी जिल्हा परिषदेच्या साखरवाडी (ता. फलटण) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सदस्य व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप आनंदराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सुपने (ता. कराड) गटातून उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शनासह दाखल केला. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदय पाटील यांनी येळगाव (ता. कराड) जिल्हा परिषद मतदारसंघातून विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. ते प्रथमच एका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत.