साताºयात दोन्ही राजे गटांत राडा- पोलिसांचा हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:43 AM2017-10-06T01:43:56+5:302017-10-06T01:44:48+5:30
सातारा : राष्टÑीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही राजेंमध्ये सुरू झालेला वाद धुमश्चक्रीत परावर्तीत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्टÑीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही राजेंमध्ये सुरू झालेला वाद धुमश्चक्रीत परावर्तीत झाला. सातारा शहराच्या मध्यभागी असलेल्या जलमंदिर आणि सुरूची या दोन बंगल्यांच्या परिसरात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा सुरू झाला. सहा वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. या धुमश्चक्रीत एका पोलीस अधिकाºयासह तिघेजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, रात्री १ वाजता उदयनराजे व त्यांचे खंदे समर्थक सातारा शहर पोलिस ठाणे परिसरात दाखल झाले. राडा अन् गोळीबाराची चर्चा पसरताच दोन्ही राजेंचे समर्थक रस्त्यावर आल्यामुळे सातारा शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ज्या कारणावरून राडा सुरू झाला त्या आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय तूर्तास बाजूला ठेवण्यात आला आहे. शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बाहेरून येणाºया वाहनांची तपासणी करूनच आत सोडली जात आहेत.