काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 06:09 PM2017-08-26T18:09:52+5:302017-08-26T20:30:01+5:30
काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.
सातारा, दि. 26- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मोहाट तालुक्याच्या जावळी येथील जवान रवींद्र बबन धनावडे (वय ३८) हे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. सैन्य दलाने शनिवारी संध्याकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. मोहाट येथील धनावडे कुटुंबीयांना जवान रवींद्र हे शहीद झाल्याचे सांगण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत. दरम्यान, जवान रवींद्र धनावडे हे शहीद झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे.
Budgam(J&K): Wreath-laying ceremony of CRPF's Jaswant Singh&Dhanawade Ravindra Baban who lost their lives in Pulwama encounter earlier today pic.twitter.com/QeYOUcsRrK
— ANI (@ANI) August 26, 2017
दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण सीआरपीएफचे आहेत. तर पाच जवान जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरु झालं. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते आहे.