इंजिनिअरिंंग कॉलेजच्या मुलांनी बनवला उपग्रह

By Admin | Published: June 22, 2016 01:50 PM2016-06-22T13:50:33+5:302016-06-22T13:53:00+5:30

थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा.

Satellite satellite created by the students of Engineering College | इंजिनिअरिंंग कॉलेजच्या मुलांनी बनवला उपग्रह

इंजिनिअरिंंग कॉलेजच्या मुलांनी बनवला उपग्रह

googlenewsNext

- राजानंद मोरे

थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा. त्यानं आपल्या शिक्षणपद्धतीतले दोष तर दाखवलेच पण तरुणांच्या कल्पना शक्तीची जाणीवही करून दिली. हे सारं फिल्मीच आहे, प्रत्यक्षात असं काही घडत नाही असं वाटत असेल तर पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजातल्या दोस्तांना भेटा. पुण्यातील कॉलेज आॅफ इंजीनिअरिंगने एक भन्नाट संधी उपलब्ध करून दिली अन् तिथल्या विद्यार्थ्यांनीही त्या संधीचं सोनं करत शब्दश: आकाशाला गवसणी घालण्याचं धाडस केलं! या शिकाऊ इंजिनिअर्स नी चक्क ‘स्वयम’ हा लघु उपग्रह तयार केला. येत्या बुधवारी हा ‘स्वयम’ आकाशात झेपावणार आहे. खुद्द ‘इस्रो’ ने या उपग्रहाच्या उपयोगितेवर शिकामोर्तब केलं आहे. ‘संदेश वहन’ हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. देशातील हा दुसऱ्या क्र मांकाचा सर्वात लहान उपग्रह आहे. याचं वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. विश्वास बसत नाही ना? पण ‘सीईओपी’ च्या १७६ विद्यार्थ्यांनी मिळून ही कमाल केली आहे. खरं तर टीम वर्कचंही हे एक उत्तम उदाहरण आहे. २००८ च्या अखेरीस या उपग्रहाची पायाभरणी झाली. त्यावेळी इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अभिषेक बाविस्कर, प्रिया गणदास, निश्चय मात्रे आणि मोहित कर्वे या चौघांची ‘स्वयम’ ही मुळ कल्पना. शुन्यातुन सुरु वात करायची होती. कॉलेज मधे याविषयीचाअभ्यासक्र म घेतला जात नाही. त्यामुळे इथे बेसिक माहितीही मिळणेही अशक्य. सुरु वातीला इंटरनेटचा आधार घेतला. शिक्षक, तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ यांच्या गाठी भेटी सुरु झाल्या. इतर सहकारी मित्रमैत्रिणींची मदत होऊ लागली. उपग्रह बनवायचा म्हणजे साधी गोष्ट नाही, याचं भान ठेवून त्यांनी प्रत्येक बाब बारकाईनं पहायला सुरु वात केली. आपल्या विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न पाहून कॉलेज प्रशासनाचीही उत्सुकता वाढली. उपग्रह बनवण्याची कल्पना कॉलेज मधे सर्वांसाठीच नविन होती. पण विद्यार्थांच्या या प्रयत्नांना कॉलेजमध्ये सर्वानीच बळ दिलं. २००९ मध्ये याला अधिकृत मान्यता दिली गेली. आता हे एक मिशन बनलं. विद्यार्थी स्वत: हे मिशन पूर्णत्वास नेणार असल्यानं त्याचं ‘स्वयम’ असंच नामकरण करण्यात आलं. ‘स्वयम’च्या निर्मितीला टप्या- टप्याने वेग येऊ लागला. खर्च, उपलब्ध साधनांचा विचार करून उपग्रह लहान असावा असे पक्के झाले होते. त्यामुळे लांबी, रु ंदी आणि उंची जवळपास १० सेंमी. पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. यासाठी लागणारी बहुतेक उपकरणं विद्यार्थ्यांनी इथंच बनवली. काही साहित्य बाजारातून आणावं लागलं. पण काम एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे वेळ लागत होता. टीम मधील काही विद्यार्थी पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. अर्थात म्हणून काम थांबलं नाही. त्यांच्यासोबत काम केलेल्या इतरांनी ही जबाबदारी स्वीकारली. पुन्हा काही नविन विद्यार्थी जोडले गेले. ही साखळी अशीच सुरु राहिली. कॉलेज कडूनही साथ मिळत होती. अथक प्रयत्नांतून २०१३ च्या सुरु वातीस स्वयम चं प्राथमिक रूप साकार झाले. इस्त्रोकडून त्याची पाहणी करण्यात आली. त्याच वर्षी कॉलेज आणि इस्त्रोमधे याबाबतचा करार झाला. चार वर्षाच्या प्रयत्नाचं चीज होणार होतं. त्यामुळे सर्वचजण आनंदून गेले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर जानेवारी २०१५मधे स्वयम इस्रोच्या मुख्य केंद्रात दाखल झाला. आणि आता तो भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्वयम’ साठी सीईओपी मधे नियंत्रण कक्ष तर संस्थेच्या इमारतीच्या छतावर अ‍ॅण्टेना उभारण्यात आला आहे. सध्या कॉलेज मधे अंतिम वर्षात शिकणारे धवल वाघुलदे, अब्दुलहुसैन सोनगरवाला, सौरभ बर्वे, तन्वी कटके आणि अभिजित राठोड हे या मिशनचं काम पाहत आहेत. बुधवारनंतर पुढील वर्षभर हे मिशन सुरु राहणार आहे. ‘स्वयम’ ची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे, पुढेही होत राहील. त्याचं आयुष्य एक वर्ष असलं तरी केवळ कॉलेज मधील १७६ विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकीच्या बळानं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आकारास आला. आणि आठ वर्षांचा हा प्रवास अन्य अनेक तरुण इंजिनिअर्सना प्रेरणा देत राहील.. 

Web Title: Satellite satellite created by the students of Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.