साठे महामंडळ घोटाळ्याच्या फायली लंपास; दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:12 AM2018-05-04T05:12:18+5:302018-05-04T05:12:18+5:30

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित फायली महामंडळाच्या कार्यालयाचे सील तोडून पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

Sathe Mahamandal scam files; Complaint filed in Dahisar police station | साठे महामंडळ घोटाळ्याच्या फायली लंपास; दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

साठे महामंडळ घोटाळ्याच्या फायली लंपास; दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next

यदु जोशी 
मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित फायली महामंडळाच्या कार्यालयाचे सील तोडून पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत असून त्याच ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय होते. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले.

साठे महामंडळाच्या कार्यालयातून फायली लंपास करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या चेंबूर येथील कार्यालयास अस्मिता संस्थेकडून त्याच दिवशी देण्यात आली.
फायली पळविणाऱ्यांमध्ये साठे महामंडळातील घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांचा भाऊदेखील होता, असे म्हटले आहे. आ. कदम या घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

इमारतीच्या तळमजल्यावर तीस वर्षे अस्मिता या सामाजिक संस्थेच्या वतीने मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग-चिकित्सा व पुनर्वसन केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या प्रमुख सुधा वाघ यांनी २८ एप्रिल रोजी घडलेल्या प्रकाराबाबत दहिसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
गुंडप्रवृत्तीचे चार-पाच जण इमारतीत आले. त्यांनी सील-कुलूप तोडून काही फायली, कागदपत्रे कारमध्ये भरणे सुरू केले. आमच्या केंद्राच्या कर्मचाºयांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दादागिरी केली. तोडलेल्या कुलपांच्या जागी नवीन कुलपे व त्यावर जुजबी सील लावून ते कारने निघून गेले, असे या तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ‘लोकमत’च्या हाती आले आहे.
 

Web Title: Sathe Mahamandal scam files; Complaint filed in Dahisar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.