सतिश शेट्टी हत्या प्रकरण - आंधळकर, कवठाळे यांचा जामीन फेटाळला
By admin | Published: June 20, 2016 09:47 PM2016-06-20T21:47:19+5:302016-06-20T21:47:19+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधाळकर व सहायक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० - माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधाळकर व सहायक पोलिस निरीक्षक नामदेव कवठाळे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी सोमवारी फेटाळून लावला. आरोपींना जामीन दिल्यास ते माजी पोलीस अधिकारी व तपास अधिकारी असल्याने पुराव्यात हस्तक्षेप करु शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे़
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० रोजी तळेगाव दाभाडे येथेहत्या करण्यात आली होती. त्यावेळी गुन्ह्याचा तपास आंधळकर यांच्याकडे होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली होती़ सतीश शेट्टी यांच्या भावाने तपास योग्य दिशेने होत नसून संशयितांकडे तपास होत नसल्याचा आरोप केला होता़ त्यानंतर गुन्ह्याचा तपास योग्य रितीने झाला नसल्याने हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती. सुरवातीला पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर दोघांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आंधळकर आणि कवठाळे यांच्या वतीने अॅड. सुधीर शहा यांनी दोघांना जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी कागदपत्रांशी छेडछाड झालेल्याचे सीबीआयच्या लक्षात आल्यानंतर आंधळकर आणि कवठाळे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या सरकारी वकीलांनी दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.