शनिवारी नितीन गडकरी खारघरमध्ये
By admin | Published: August 4, 2016 02:09 AM2016-08-04T02:09:43+5:302016-08-04T02:09:43+5:30
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज आॅफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवार
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज आॅफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवार, ६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
खारघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली. १९९४ साली चांगू काना ठाकूर विद्यालयाची स्थापना झाली असून महाविद्यालयात विविध प्रकारचे उच्च शिक्षण दिले जात आहे. आज या महाविद्यालयात एकूण ४,००० विद्यार्थी शिक्षण घेत असून याच धर्तीवर खारघर सेक्टर ३३ येथे अद्ययावत अशा रामशेठ ठाकूर कॉलेज आॅफ कॉमर्स अँड सायन्स या नव्या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन शनिवार, ६ आॅगस्ट रोजी पार पडणार असून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत आदी उपस्थित राहणार आहेत.