शनिवार ठरला अप‘घात’वार

By admin | Published: April 16, 2017 02:40 AM2017-04-16T02:40:56+5:302017-04-16T02:40:56+5:30

महामार्गावरून प्रवास करताना अपघात घडण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. शनिवारी अशाच दोन दुर्घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसह डहाणुतील चारोटी नाक्याजवळ घडल्या.

Saturday's up'fight ' | शनिवार ठरला अप‘घात’वार

शनिवार ठरला अप‘घात’वार

Next

वावोशी / कासा : महामार्गावरून प्रवास करताना अपघात घडण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. शनिवारी अशाच दोन दुर्घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसह डहाणुतील चारोटी नाक्याजवळ घडल्या. यात एकूण पाच जणांना नाहक जिवाला मुकावे लागले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या पीकअप व्हॅनने कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात पीकअपमध्ये बसलेले विकास विलास पाटील (रा. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंकुश शिंदे (३१ रा. पाटन, जि. सातारा) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
या अपघातात पीकअप व्हॅनचालक लहू झोरे (रा. मानखुर्द, मुंबई) करकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, खोपोली पोलीस, आयआरबी टीम व खोपोलीतील सामाजिक संघटना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अपघाताची दुसरी घटना डहाणूत घडली. डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्याजवळील तवा येथे महामार्गावर शनिवारी पहाटे २.३० वा.च्या सुमारास मुंबईहून गुजरातकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारच्या चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरवर जोरात आदळून दोन ते तीनदा पलटी मारून रस्त्याच्या कडेला १५ ते २० फूट खाली कोसळली.
या भीषण अपघातात कुणाल साब (२५), विशाल परेश दोडीया (३०), सुखविंदर सिंग गुजराल (३७) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, रवी सातिया रेड्डी (३४), किरण वेंकटरमण अयाती (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयातून सिल्वासा येथील विनोबा भावे रुणालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व जण सुरतचे रहिवासी आहेत. (प्रतिनिधी/वार्ताहर)

चालकाची डुलकी ठरली जीवघेणी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर झालेल्या या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. झोप अनावर झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गाडीचालक विजय जाधाव हे बचावले असून, त्यांनीच टोलनाक्यावर येऊन अपघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Saturday's up'fight '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.