शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने करावे, सत्यजित तांबेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:40 PM2023-03-10T20:40:41+5:302023-03-10T20:41:05+5:30

Satyajit Tambe : खर्चही आपण करतो पैसेही आपण देतो मात्र हे पैसे योग्य पद्धतीने दिले तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.

Satyajit Tambe demands that the medical bills of teachers and non-teaching staff should be made cashless | शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने करावे, सत्यजित तांबेंची मागणी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने करावे, सत्यजित तांबेंची मागणी

googlenewsNext

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने होतात. परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे बिल मंजुरीसाठी मंत्रालयापर्यंत येतात. त्याचा परिणाम असा होतो की, त्या बिलाच्या रकमेचे 30 ते 40% पैसे वेगवेगळ्या प्रकारचा पाठपुरावा करण्यातच वाया जातात. सुमारे दोन ते चार वर्ष ही रक्कम त्यांना मिळत नाही. अनेक जणांचे पाठपुरावे आम्ही स्वतः मंत्रालयात करत असतो. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमची कॅशलेस पद्धतीची व्यवस्था करून दिली, तर ते योग्य होईल. खर्चही आपण करतो पैसेही आपण देतो मात्र हे पैसे योग्य पद्धतीने दिले तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. 

अनेक शिक्षक संघटना व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या अडचणी आहेत. आज योगायोगाने शिक्षण मंत्री व उच्चतंत्र शिक्षण मंत्री देखील सभागृहात उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस बैठक घेण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांनी देखील बैठकीसाठी एक दिवस आम्हाला द्यावा. या सर्व मान्यता प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना असतील त्यांना आपण टप्प्याटप्प्याने बोलावून त्यांचे प्रश्न समजून घेऊ. यातील सर्वच गोष्टी आर्थिक बाबींशी निगडित नाहीत. अनेक गोष्टी या धोरणात्मक बाबतीशी निगडित आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण एक दिवस द्यावा यामुळे 90% प्रश्न मार्गी लागतील अशी मला आशा आहे. राज्य शासनाला या संदर्भात निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठी त्यांनी तातडीने पावलं उचलावी. असे आवाहन सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे केले.

याचबरोबर, 135 कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशात. साडे 16 कोटी लोक विविध पेन्शन योजनांच्या माध्यमातून स्वतःच पेन्शन राबवतात. मग तो खाजगी व्यावसायिक, उद्योगधंदा करणारा, डॉक्टर, इंजिनियर या प्रत्येकाला चिंता आहे, की निवृत्तीनंतर माझं काय होणार? यासाठी अनेक कंपन्यांनी योजना सुरू केल्या आहेत. आज संपूर्ण देशात 84 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या किंवा नवीन पेन्शन योजनेच्या माध्यमातून यामध्ये भाग घेतला आहे. महाराष्ट्रातील 14 लाख कर्मचारी यात सहभागी आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात 'सर्व मान्यता प्राप्त संघटनांना एक दिवस बैठकीसाठी बोलवणार', अशी घोषणा सभागृहात केली होती. या घोषणेचं मी स्वागत करतो. या बैठकीची तारीख तातडीने कळाली आणि त्यानुसार त्याचे नियोजन केलं, तर या सर्व कर्मचारी व शिक्षक संघटना समोर येतील व त्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो, असे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. 

Web Title: Satyajit Tambe demands that the medical bills of teachers and non-teaching staff should be made cashless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.