सौदीतील 'तो' दहशतवादी बीडचा फय्याज कागजीच?
By admin | Published: October 7, 2016 10:03 AM2016-10-07T10:03:39+5:302016-10-07T10:06:27+5:30
जेद्दा हल्ल्यातील सुसाइड बॉम्बर अब्दुल्ला कझार खान हाच फय्याज कागजी असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारला दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - सौदी अरेबियामधील जेद्दामध्ये झालेला आत्मघातकी स्फोटांशी महाराष्ट्रचे कनेक्शन असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. हा स्फोट मूळचा बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर इथे राहणारा रहिवासी आणि अबु जुंदालचा साथीदार फय्याज कागजीने घडवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
जेद्दा हल्ल्यातील सुसाइड बॉम्बर अब्दुल्ला कझार खान हाच फय्याज कागजी असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारला दिली आहे. यानंतर आता केंद्र सरकार , मृत दहशतवादी अब्दुल्ला कलझर खान आणि फय्याज कागजी यांचा काही संबंध आहे का? याची खातरजमा करण्यासाठी सौदी अरेबियाला पत्र पाठवण्याची तयारीत आहे.
दरम्यान, अबु जुंदालच्या अटकेनंतर गरज संपल्यामुळे कागजीची दहशतवादी संघटनांनीच हत्या केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. जेद्दातील हल्ला हा ठार झालेला दहशतवादी अब्दुल्ला खान पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा सौदी अरेबियातील तपास यंत्रणांनी केला होता. यासंदर्भात प्रसिद्ध केलेला फोटो हा फय्याज कागजीशी मिळताजुळता असल्याने अब्दुल्ला हाच कागजी असल्याचा संशय एसटीएसने व्यक्त केला होता.
आता संशय आणखी दाट झाल्यामुळे कागजीचे डीएनए सॅम्पल्स मिळवून, फय्याजच्या आई वडिलांच्या डीएनएशी तपासून पाहिले जाणार आहेत. फय्याज औरंगाबादमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य, 26/11 हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असल्याने गेल्या दहा वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड असलेल्या या दहशतवाद्याच्या मागावर महाराष्ट्र पोलीस होते.