तेरा भाषांमधील संकेतस्थळे देणार सावरकरांची माहिती !
By Admin | Published: December 22, 2014 04:55 AM2014-12-22T04:55:42+5:302014-12-22T04:55:42+5:30
‘सावरकर डॉट कॉम’ या संकेतस्थळाला अल्पावधीतच ७ लाखांहून अधिक सावरकरप्रेमींनी भेट दिली आहे. त्यामुळे सावरकर स्मारकाच्या वतीने हे संकेतस्थळ
मुंबई : ‘सावरकर डॉट कॉम’ या संकेतस्थळाला अल्पावधीतच ७ लाखांहून अधिक सावरकरप्रेमींनी भेट दिली आहे. त्यामुळे सावरकर स्मारकाच्या वतीने हे संकेतस्थळ लवकरच १३ भाषांमध्ये प्रसिद्ध होणार असून, या संकेतस्थळावरील साहित्यही सावरकरप्रेमींसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने हाती घेतलेल्या हा उपक्रम पहिल्या टप्प्यात असून, लवकरच नव्या पिढीच्या भेटीला ही संकेतस्थळे येतील.
क्रांतिकारकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित राष्ट्रीय स्मृती संग्रहालय, अंदमान प्रतिकृतीची उभारणी करण्यात येणार असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)