सोशलमिडियावर ‘सेव्ह आराध्या’ मोहीम

By Admin | Published: April 9, 2017 08:30 PM2017-04-09T20:30:41+5:302017-04-09T20:30:41+5:30

सध्या देशभरात मानवी आवयवांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे लाखो लोकांनी प्राण गमवावे लागत आहेत.

'Save Aaradhay' campaign on social media | सोशलमिडियावर ‘सेव्ह आराध्या’ मोहीम

सोशलमिडियावर ‘सेव्ह आराध्या’ मोहीम

googlenewsNext
>राम शिनगारे / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 9 - सध्या देशभरात मानवी आवयवांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे लाखो लोकांनी प्राण गमवावे लागत आहेत. आपण अवयवदान केल्यास अनेकांना जिवनदान मिळू शकते. यासाठी मरणोत्तर आवयवदान करण्याचे आवाहन डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोशलमिडियावर करण्यात येत आहे. यासाठी ‘सेव्ह आराध्या’ या  ट्रेंडची धुम सुरु आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य दिन, दलित, वंचित, उपेक्षितांसाठी खर्ची केले आहे. या कार्याला मानवंदना देण्यासाठी त्यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी सोशलमिडियावर डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे.  फेसबुक, व्टिटर, व्हाट्अप, इन्स्टाग्राम आदी सोशल साईटवर याचे जोरदार कॅम्पेन करण्यात येत आहे. यासाठठी ‘सेव्ह आराध्या’, ‘आॅर्गन डोनेशन’ ही टॅगलाईन वापरण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान हा ट्रेंड सर्वत्र जोरदारपणे सुरु होता. दुसºया दिवशीही हाच ट्रेंड कायम होता. नेटिझन्स या ट्रेंडला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. अनेकांनी अवयवदान करण्याचा अर्ज भरुन त्याचे छायाचित्र सोशलमिडिवर टाकले आहे.
कोण आहे आराध्या
मुंबईतील आराध्या मुळे या चार वर्षीय मुलीला डायलेटेड कार्डिओमायोपाथी हा दुर्धर प्रकारचा हृदयविकार झाला आहे. तीला वाचविण्यासाठी सध्या एका हृदयाची आवश्यकता आहे. आराध्यासाठी ड+, ड -, अ +, अ - या रक्तगटाचा दाताच ह्रदयदान करु शकतो. यासाठी १० ते १५ वयोगटातील व्यक्तीची गरज आहे. जिचे वजन ४० किलोपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आराध्याला मदत करण्याचे आवाहन ‘सेव्ह आराध्या’तून करण्यात येत आहे. याचबरोबर अवयवदान ही काळाची गरज असल्यामुळे ते प्रत्येकाने करावे हा सामाजिक संदेशही यातून देण्यात येत आहे.
मी केले तुम्ही करणार का?
सोशलमिडियावर मी केले तुम्ही करणार का? असा प्रश्नही व्टिटरवर नेटिझन्स अवयवदानावर विचारत आहेत.  यावर अनेकजण कॉमेंट, लाईक, शेअर करून ‘सेव्ह आराध्या’ला पाठिंबा देत आहेत. यातून अवयवदानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे.
 

Web Title: 'Save Aaradhay' campaign on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.