माळढोक वाचवा, संवर्धनासाठी जगभरातून आवाहन; ‘आययूसीएन’च्या जागतिक परिषदेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:04 AM2021-10-04T06:04:29+5:302021-10-04T06:05:05+5:30

हा पक्षी वर्षातून एकदाच अन् एकच अंडे देतो, तेही उघड्या शेतात. त्या अंड्यातून पिल्लू जन्मेपर्यंत त्याचे रक्षण होण्याची गरज असते

Save Maldhok, a worldwide appeal for conservation; Resolution at the IUCN World Conference | माळढोक वाचवा, संवर्धनासाठी जगभरातून आवाहन; ‘आययूसीएन’च्या जागतिक परिषदेत ठराव

माळढोक वाचवा, संवर्धनासाठी जगभरातून आवाहन; ‘आययूसीएन’च्या जागतिक परिषदेत ठराव

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : माळढोक या देखण्या पक्ष्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना त्याच्या संवर्धनाची काळजी आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहिली जात आहे. नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’च्या (आययूसीएन) परिषदेमध्ये या पक्ष्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचा ठराव करण्यात आला. सोलापुरातील पक्षीप्रेमींनी या ठरावाचे स्वागत केले आहे.

नान्नजच्या माळढोक अभयारण्यामुळे सोलापूरची ओळख जागतिक पातळीवरील पक्षीप्रेमींमध्ये झाली. एकेकाळी सोलापूर परिसरात या राजस पक्ष्यांची संख्या शंभराहून अधिक नोंदली होती. त्यात वाढ होण्याऐवजी ती वरचेवर घटत चालल्याचे चित्र आहे. दहा वर्षांपूर्वी १६ माळढोक आढळल्याची नोंद असताना  इथे सध्या तीनच पक्षी असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.

हा पक्षी वर्षातून एकदाच अन् एकच अंडे देतो, तेही उघड्या शेतात. त्या अंड्यातून पिल्लू जन्मेपर्यंत त्याचे रक्षण होण्याची गरज असते. मात्र, श्वान, घोरपडी ती अंडी खाऊन टाकतात. या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केल्याने सध्या हा पक्षी दुर्मीळ होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर काही राजकीय हितसंबधांमुळेही या अभयारण्याच्या क्षेत्रावर संक्रांत आली. अभयारण्य असलेल्या परिसरातील दगड खाणींमुळे माळढोकच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळू शकते मदत
माळढोकचा विषय हा आता ‘आययूसीएन’च्या जागतिक स्तरावर होणाऱ्या संवर्धन कार्यक्रमांचा आणि धोरणांचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. यामुळे कृत्रिम प्रजननासारखे उपाय करून माळढोकची संख्या वाढविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. संशोधन व संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय मदत मिळू शकते. माळढोकचा विषय हा आता ‘आययूसीएन’च्या जागतिक स्तरावर होणाऱ्या संवर्धन कार्यक्रमांचा आणि धोरणांचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. यामुळे कृत्रिम प्रजननासारखे उपाय करून माळढोकची संख्या वाढविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. संशोधन व संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय मदत मिळू शकते.

Web Title: Save Maldhok, a worldwide appeal for conservation; Resolution at the IUCN World Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.