अकोल्यात ६०० हून जास्त दुर्मिळ औषधी वनसपतीचे जतन
By admin | Published: September 2, 2016 04:15 PM2016-09-02T16:15:45+5:302016-09-02T16:15:45+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जून वन औषधी उद्यानात ६०० पेक्षा अधिक दुर्मिळ वनऔषधी,सुगंधी वनस्पतीचे जतन केले आहे
Next
>- राजरत्न सिरसाट / ऑनलाइन लोकमत
सर्पदंशावरील खंडसीगपासून ते व्यावसायीक सुंगधी वनस्पती उपलब्घ
अकोला, दि. 2 - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जून वन औषधी उद्यानात ६०० पेक्षा अधिक दुर्मिळ वनऔषधी,सुगंधी वनस्पतीचे जतन केले आहे. संपदंर्शावरील खडसींग या वनस्पतीपासून शेतक-यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी सुंगधी वनस्तीची लागवड व प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकºयांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी कंरज, बिहाडा, गुग्गुळ, अडूळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यासह विविध दुर्मिळ औषधी वनस्पतीचा समावेश आहे.मसाले पदार्थाची विविध जाती येथे असून, मसाले शेतीनंतर विदर्भात सुंगधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यान विभागाने शेतकºयांना बघण्यासाठी तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील मोजक्या शेतकºयांनी सध्या तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू केली आहे.आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी येथे भेटी देत असून, येथील शास्त्रज्ञांकडून माहिती जाणून घेतात.
पारंपरिक शेतीसोबतच विदर्भातील शेतकरी मसाले, सुगंधी औषधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक शेतीची कास धरीत आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी विवेक संगवई यांनी तिखाडी गवताची लागवड केली असून, यापासून तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. तथापि या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकºयांनी सुंगधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. याकरिता या शेतकºयांनी तिखाडी तेलाच्या व्यावसायिक शेतीकडे वळावे, असे प्रयत्न या कृषी विद्यापीठाकडून सुरू आहेत. नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा पुरवठा गरजवंतांना उपलब्ध करण्यात येत आहे.
- नागार्जून वनऔषधी उद्यानात ६०० च्यावर विविध दुर्मिळ वनऔषधी,सुगंधीवनस्पतीचे जतन केले आहे. शेतकºयांनी या वनस्तपतीची व्यावसायीक शेती करावी हा उद्देश आहे.
- डॉ. संजय वानखडे, सहयोगी संशोधन संचालक, डॉ.पंदेकृवि,अकोला.