पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत

By admin | Published: May 11, 2016 04:12 AM2016-05-11T04:12:11+5:302016-05-11T04:12:11+5:30

पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे

Saving water drops | पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत

पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत

Next

मुंबई : पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी कर्मचारी आणि वेटर्स गंभीरपणे प्रयत्न करीत असल्यामुळे एरवी वाया जाणाऱ्या पाण्यामुळे आता ‘जलमित्र’चे ड्रम्स भरून जात आहेत.
या राज्यव्यापी अभियानाचा सोमवारी प्रारंभ झाला. राज्यातील प्रत्येक शहरातील सुमारे ७५० हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीनमध्ये जलबचतीचा संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले. याशिवाय तेथील कर्मचाऱ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी वाचविण्याच्या पध्दती समजावून सांगण्यात आल्या. जलमित्र अभियान ज्या हॉटेल्समध्ये सुरू झाले. तेथे ‘लोकमत’च्या वतीने ड्रम्स दिले आहेत. या अभियानाच्या प्रत्यक्ष कृतीच्या आजच्या पहिल्या दिवशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सायंकाळी हॉटेल्सला भेटी देऊन पाहणी केली असता तेथे ड्रम्समध्ये निम्म्याहून अधिक पाणी साचल्याचे दिसून आले.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या कर्मचाऱ्यांचा जलमित्र अभियानात कृतिशील सहभाग दिसून आला. वेटर्सनी आज ग्राहकांसमोर पाण्याने भरलेला जग ठेवण्यापेक्षा ग्राहक जितके मागतील तितकेच पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर ज्या ग्राहकाने ग्लासात पाणी ठेवले होते. ते पाणी सिंकमध्ये ओतून देण्यापेक्षा वेटर्सनी ते ‘जलमित्र’च्या ड्रममध्ये साठविले. या पाण्याचा पुनर्वापर हॉटेल्समधील झाडांना, वेलींना तसेच फरशी स्वच्छ करण्यासाठी करण्याच्या सूचना हॉटेल चालकांनी दिल्या असल्याचे वेटर्सनी सांगितले. जलमित्र अभियानाचा हा पहिला आठवडा असून, हॉटेल्सप्रमाणेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, शहरांमधील मॉल्स, मल्टिप्लेक्समध्येही अशाच प्रकारे जनजागरण करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Saving water drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.