सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला चिकटली वस्तू

By admin | Published: August 4, 2016 07:48 AM2016-08-04T07:48:53+5:302016-08-04T10:57:44+5:30

अंधार पडल्यामुळे रात्री थांबवण्यात आलेले महाड सावित्री नदीतील शोधकार्य गुरुवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

In Savitri, the search started in the river, the magnet stuffed | सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला चिकटली वस्तू

सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला चिकटली वस्तू

Next

ऑनलाइन लोकमत 

महाड, दि. ४ - अंधार पडल्यामुळे रात्री थांबवण्यात आलेले महाड सावित्री नदीतील शोधकार्य गुरुवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आले आहे. दरम्यान एक वस्तू सापडल्याचे वृत्त आहे. शक्तीशाली चुंबकाच्या सहाय्याने सुरु असलेल्या शोध मोहिमेत चुंबकाला एक वस्तू चिकटल्याचे वृत्त आहे. मात्र चिकटलेली वस्तू नेमकी कुठली आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पाण्याखालच्या वस्तूंचा चुंबकाच्या मदतीने शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी रात्री ११.३०च्या सुमारास महाड-पोलादपुरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळला. यावेळी पुलावर असलेल्या दोन एसटी बससह काही वाहने वाहून गेली. 
 
आणखी वाचा 
घटनास्थळापासून ७० किमी अंतरावर सापडला ड्रायव्हरचा मृतदेह
महाड दुर्घटनेतील मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेले ?
महाबळेश्वरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, शोधकार्यात अडथळे वाढणार 
 
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी पहाटेपासून एनडीआरएफ, सागरी तटरक्षक दल, नौदलासह पोलीस दलाकडून बेपत्ता प्रवाशांचे युद्धपातळीवरून शोधकार्य सुरू आहे. मात्र काल दोन मृतदेह वगळता काही हाती लागले नाही. रात्री अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले होते. 
 
नौदल आणि तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरच्या मदतीनेही शोधकार्य सुरु आहे. दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरीवली या दोन बसेस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या असून, दोन बसेसमध्ये चालक-वाहकांसह एकूण ३० ते ३५ प्रवासी असल्याची माहिती आहे. 

Web Title: In Savitri, the search started in the river, the magnet stuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.