Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 10:10 AM2020-01-03T10:10:28+5:302020-01-03T10:23:09+5:30

महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजासाठी आयुष्यभर झटत राहिलेल्या सावित्रीबाईंबाबतच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

Savitribai Phule Birth Anniversary Know About The 19th Century Social Reformer | Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी

Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, जाणून घ्या 'या' खास गोष्टी

googlenewsNext

मुंबई - स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्व. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षण्यास सुरुवात केली. महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजासाठी आयुष्यभर झटत राहिलेल्या सावित्रीबाईंबाबतच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

- सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी, 1831मध्ये झाला.

- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत 1840 रोजी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला.

- सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका असून त्या महिला मुक्ती आंदोलनाच्या नेत्या होत्या.

Savitribai became the first teacher at the age of 18 | अवघ्या अठराव्या वर्षी सावित्रीबाई फुले झाल्या पहिल्या शिक्षिका

- सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्यासोबतीने मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यातील पहिली शाळा त्यांनी पुण्यात सुरू केली होती. 

- 28 जानेवारी 1853 मध्ये गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्‍या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 

- सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात सतीप्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारले.

- विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलं.

- सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करणाऱ्या विधवा ब्राह्मण महिला काशीबाईंची आपल्या घरामध्ये प्रसुती करून त्यांचा मुलगा यशवंतचा आपला दत्तक पुत्र म्हणून सांभाळ केला. पुढे जाऊन यशवंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाला. 

- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांचं अर्धवट राहिलेलं समाजकार्य पूर्ण करण्याचा निर्धार केला. 

Savitribai Phule Birth Anniversary know the unknown and intrestin facts of this inspiring personality | Savitribai Phule Birth Anniversary: सावित्रीबाई फुलेंच्या

- 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. 

- सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन महिला आणि दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेचले. 

 

Web Title: Savitribai Phule Birth Anniversary Know About The 19th Century Social Reformer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.