सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार जाहीर

By admin | Published: April 6, 2017 02:17 AM2017-04-06T02:17:12+5:302017-04-06T02:17:12+5:30

सुनीता देवधर पुरस्कृत ‘सावित्रीबाई फुले स्त्री गौरव’ पुरस्कार कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचा आधार असलेल्या प्रीती पाटकर यांना जाहीर झाला

Savitribai Phule Female Gaurav Award | सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार जाहीर

Next

मुंबई : मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ संस्थेचा सुनीता देवधर पुरस्कृत ‘सावित्रीबाई फुले स्त्री गौरव’ पुरस्कार कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचा आधार असलेल्या प्रीती पाटकर यांना जाहीर झाला असून, हा पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. निवृत्त अतिरिक्त पोलीस उपायुक्त शिरीष इनामदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक चळवळीशी बांधिलकी ठेवणाऱ्या, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध, तसेच वेश्याव्यवसायातून सुटका केलेल्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी व सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व त्यांच्या व्यथा समाजापुढे मांडणाऱ्या प्रेरणा संस्थेच्या संस्थापक, संचालिका प्रीती पाटकर यांना रेड लाइट परिसरातील वेश्यांच्या मुलांसाठी नाइट केअर सेंटर-रात्रीचे निवारागृह सुरू करण्याचे श्रेय जाते. संपूर्ण जगातील अशा प्रकारचे हे पहिले निवारागृह आहे़ ही संस्था वाशी येथे सक्षमीकरण केंद्रे चालवते. कार्यक्रमात प्रीती पाटकर यांची प्रकट मुलाखतही घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Savitribai Phule Female Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.