सव्वाकोटीची वीज चोरी

By admin | Published: February 6, 2017 01:46 AM2017-02-06T01:46:47+5:302017-02-06T01:46:47+5:30

महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये वर्षभरात १ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपयांची वीजचोरी उघड झाल्याची माहिती समोर आली आहे

Savvakoti's electricity theft | सव्वाकोटीची वीज चोरी

सव्वाकोटीची वीज चोरी

Next

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये वर्षभरात १ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपयांची वीजचोरी उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. याविरुद्धच्या मोहिमांमध्ये महावितरणने तब्बल ७५० वीज चोरट्यांना कारवाईचा झटका दिला आहे. वीज चोरीला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांदरम्यान महावितरणने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २७ जणांविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Web Title: Savvakoti's electricity theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.