पावसामुळे सवाई महोत्सव लांबणीवर
By admin | Published: December 13, 2014 12:15 AM2014-12-13T00:15:35+5:302014-12-13T00:15:35+5:30
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला.
Next
पुणो : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला. अगदी शेवटच्या क्षणार्पयत वाट पाहूनही पाऊस थांबण्याची शक्यता दिसत नसल्याने महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. राज्यात आणखी चार दिवस पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याने जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नव्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आत्ताच्या तिकिटावरच महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची आजची 3.3क् ही नियोजित वेळ ठरलेली होती. परंतु दीडच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण स्वरमंडप गळायला सुरुवात झाली. मात्र, पावसाची चिकचिक असूनही हजारो रसिक उपस्थित होते. तब्बल दीड तास रसिक बसून होते. त्यामुळे पाच वाजता महोत्सव सुरू करण्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली. मात्र, त्याच वेळी पुन्हा पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यामुळे शेवटी आयोजकांकडून महोत्सव पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होणा:या महोत्सवाचा आस्वाद आत्ताच्या तिकिटांवरच घेता येईल, असे सांगून आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी रसिकांना मोठा दिलासा दिला. निसर्गाच्या लहरीमुळे महोत्सव रद्द झाल्याने रसिकही कोणताही नाराजीचा सूर प्रकट न करता मंडपातून माघारी परतले. आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे स्वरमंडपाचा पूर्णत: बोजवारा उडाला. खांब उखडलेले, स्टेजवर पाणी, सगळीकडे चिखलाचे साम्राज्य, कार्पेट पाण्याने ओले चिक्क, असे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, तरीही रसिकांनी स्वरमंडप सोडला नाही. पावसाने आयोजकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले. तत्काळ हालचाली करीत महोत्सवाच्या 40 हजार चौरस फूट जागेत ताडपत्री आणि वरून प्लॅस्टिक टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, पाऊस थांबत नसल्याने मंडळाच्या पदाधिका:यांनी बैठक घेऊन महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
जानेवारी, फेब्रुवारीत नव्याने होणार आयोजन
चाळीस वर्षापूर्वी असाच मुसळधार पाऊस झाला होता. त्या वेळी गोखले मंडपवाल्यांनी रसिकांना बसायला पाट दिले होते. मात्र, पाऊस सुरूच राहिल्याने महोत्सव पुढे ढकलावा लागला. 1999ला हीच परिस्थिती होती. 2क्1क् मध्ये स्वाइन फ्लूच्या थैमानामुळे जानेवारीत महोत्सवाचे आयोजन केले होते.
अवकाळी पावसामुळे विजेचा आणि पाण्याचा धोका आहे. महोत्सव उद्या आणि परवाही घेता येऊ शकतो; मात्र रसिकांच्या जिवाशी आम्ही खेळू शकत नाही. म्हणून महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- श्रीनिवास जोशी,
कार्याध्यक्ष, आर्य प्रसारक मंडळ