सावंतवाडी : बांदा सकेंश्वर महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 11:03 PM2021-07-03T23:03:41+5:302021-07-03T23:05:48+5:30

लोकमतचे वृत्तच खरे ठरले, अफवांना ब्रेक; माजी आमदार शिवराम दळवींना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पत्र.

Sawantwadi Banda Sakenshwar Highway will pass through Sawantwadi | सावंतवाडी : बांदा सकेंश्वर महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार 

सावंतवाडी : बांदा सकेंश्वर महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार 

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतचे वृत्तच खरे ठरले, अफवांना ब्रेकमाजी आमदार शिवराम दळवींना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पत्र

अनंत जाधव    
सावंतवाडी : महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणाऱ्या नव्या रेडी संकेश्वर मार्गाऐवजी केंद्राने संकेश्वर-बांदा मागार्ला मंजुरी दिली असून, त्याबाबतचा अद्यादेश ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आले होता. मात्र हे वृत्त प्रसिद्ध होताच अनेकांनी अफवा पसरवत हा रस्ता बावळट मार्गे बांद्याला जोडणार असे सर्वत्र पसरवले होते. मात्र आता खुद्द राष्ट्रीय महामार्ग विभागानेच सदरचा रस्ता हा सकेंश्वर बांदा असा असून तो सावंतवाडीतूनच जाणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. तसे पत्रही या विभागाने माजी आमदार शिवराम दळवी यांना दिल्याने आता अफवांना ब्रेक लागला असून ऑनलाईनने २६ सप्टेंबर २०२० रोजी दिलेलेच वृत्त खरे ठरले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या नव्या महामागार्ची संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. त्यानंतर रेडीपासून संकेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. मात्र नव्या सर्व्हेक्षणात हा रस्ता संकेश्वरवरून रेडीला जोडण्याऐवजी बांद्याला जोडण्याचे निश्चित करण्यात आले होते. कारण कर्नाटकमधील संकेश्वर येथे जंक्शन असून, तसेच बांदा येथे करण्याचे ठरवण्यात आले असून, संकेश्वर व बांदा ही जंक्शन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन मार्ग संकेश्वर ते बांदा असा करण्यात आला आहे. १०३ किलोमीटरचा असणार आहे.

हा रस्ता कर्नाटकातून संकेश्वरवरून येथून सुरू होणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजारा तर सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली-माडखोल-सावंतवाडी-इन्सुलीवरून तो महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांद्याला जोडला जाणार आहे. हा महामार्ग एनएच ४८ म्हणून ही निश्चित करण्यात आला असून, तो बांदा येथे एनएच ६६ ला जोडला जाणार आहे. दरम्यान, या प्रस्तावित रस्त्याचा अद्यादेश ही काढण्यात आला त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम ही अंतिम टप्यात आले असतनाच काहींनी हा रस्ता आंबोलीतून उतरल्यानंतर बावळट येथून बांदा येथे जोडला जाईल अशा प्रकारची अफवा पसरवण्यास सुरूवात केली होती.

मात्र आता याबाबत कोल्हापूर उपविभागीय राष्ट्रीय महामागार्चे उपअभियंता पी.जी.बारटक्के यांनी अधिकृतपणे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांना माहीती दिल्याने आता या रस्त्याच्या अधिकृत मार्गावर शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकमतने सर्वात आधी वृत्त दिले होते
सकेंश्वर बांदा मार्गाबाबत सर्वात प्रथम लोकमतने वृत्त दिले होते. मात्र नंतर काहींनी ही अफवा पसरवत आपल्या पद्धतीने नवनवीन मार्ग निर्माण केले होते. पण आता राष्ट्रीय महामार्ग विभागानेच अद्यादेशासह पत्र जाहीर केल्याने अफवांना ब्रेक लागला आहे.

Web Title: Sawantwadi Banda Sakenshwar Highway will pass through Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.