सावंतवाडी : धरणाच्या बंधार्‍यावरुन चालण्याची पैज आली 'अंगलट' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 11:32 PM2021-06-26T23:32:03+5:302021-06-26T23:34:03+5:30

बुडणाऱ्या दोघा युवकांना दिला झाडांच्या फांदीने दिला आधार. सावंतवाडी जवळच्या माडखोल येथील घटना.

Sawantwadi two people in drowned in Dam | सावंतवाडी : धरणाच्या बंधार्‍यावरुन चालण्याची पैज आली 'अंगलट' 

सावंतवाडी : धरणाच्या बंधार्‍यावरुन चालण्याची पैज आली 'अंगलट' 

googlenewsNext
ठळक मुद्देबुडणाऱ्या दोघा युवकांना दिला झाडांच्या फांदीने दिला आधार.सावंतवाडी जवळच्या माडखोल येथील घटना

सावंतवाडी : मौजमजा करताना मारलेली पैज कशी अंगाशी येऊ शकते, याचा प्रत्यय शनिवारी सावंतवाडी जवळच्या माडखोल येथील धरणावर आला. ओव्हर फ्लो झालेल्या बंधाऱ्यावरून पाण्यातून कोण चालू शकतो, अशी पैज लागली आणि ती दोघांच्या अंगलट आली. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांना वाचविण्यास यश आले. खरे मात्र बुडणाऱ्या यातील युवकांने झाडांच्या फादीचा आधार घेतला, तर दुसरा दगडात अडकल्याने वाचवण्यात यश आले. अखेर स्थानिकांनी  प्रवाहात स्वत:चा जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले.

माडखोल धरणावर परिसरातील चौघे युवक फिरण्यासाठी गेले होते. त्यातील एक युवक आंघोळीसाठी खाली पाण्यात उतरल्याचे सांगण्यात येते. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता कि तो युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. ही घटना बघून त्यांच्या सबतच्या युवकांने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकली. पण तोही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असतनाच तेथे असलेल्या एका झाडाची फांदी त्याच्या हाताला लागली आणि तो तेथेच थांबला. तर दुसरा युवक प्रवाहात अडकून पडला होता.

दोघेही आता पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणार असे वाटत असतना च त्याच्या सोबतच्या युवकांनी आरडाओरड केली. त्यानंतर गावातील अनेक जण दोरी तसेच पाण्यात उतरण्यासाठी लागणाऱ्या आपत्कालिन साहित्यासह दाखल झाले. तसेच पोलिसांनाही माहीती देण्यात आली. मात्र ग्रामस्थांनी दोरी प्रवाहात टाकत स्वत: प्रवाहात गेले आणि त्याना बाहेर काढले. यावेळी युवक चांगलेच घाबरले होते. घटनेनंतर माडखोल परिसरात ही मोठी गर्दी झाली होती. मात्र स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीवन केसरकर, सुनिल केसरकर, शुभम केसरकर, गोविद शेटकर, आप्पा राउळ, कृष्णा राउळ, गोविंद लातये आदींनी या युवकांचे जीव वाचवले.

मात्र हे युवक बुडत असतना त्यांना एका झाडांच्या फादीने आधार दिल्याने ते बचावले अन्यथा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले असते. मात्र स्थानिकांनी जीवाची बाजी लागवली त्यांचे कौतुक होत आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हुदेकर हे आपल्या कर्मचाऱ्ंयांसह दाखल होत गर्दी नियंत्रणात आणण्या साठी मदत केली. 

लोकमतकडून धरणाच्या सुरक्षेबाबत आवाज
लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणाची सुरक्षा राम भरोसे असल्याचे वृत्त दोन दिवसापूर्वीच लोकमतने प्रसिद्ध केले होते. या धरणावर कोणीही ये-जा करत असते. लघू पाटबंधारे विभागाचा कोणीही कर्मचारी तेथे नसतो तसेच धरणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना नसल्यानेच तेथे मोठी गर्दी होते आणि असे प्रकार घडतात.

Web Title: Sawantwadi two people in drowned in Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.