सोशल मीडियावर भाजपाला मिळाला सव्वाशेर
By admin | Published: February 7, 2017 09:35 PM2017-02-07T21:35:47+5:302017-02-07T21:39:28+5:30
फोटोशॉप, आक्रमक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करण्यात भाजपाची सोशल मीडिया टीम आघाडीवर असते. पण गेल्या काही काळात भाजपालाही सोशल मीडियावर सव्वाशेर मिळताना दिसत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारतातील राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर करण्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. मग 2014 च्या निवडणुका असो वा त्यानंतर उद्भवलेले वाद, भाजपाने या अस्त्राचा नेहमीच प्रभावीरित्या वापर केला आहे. फोटोशॉप, आक्रमक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करण्यात भाजपाची सोशल मीडिया टीम आघाडीवर असते. पण गेल्या काही काळात भाजपालाही सोशल मीडियावर सव्वाशेर मिळताना दिसत आहे. विशेषत: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने याआधी दिलेली आश्वासने, अच्छे दिन यावरून भाजपाला सोशल मीडियावर लक्ष्य केले जात आहे. असेच काही मजेदार, फोटो आणि कमेंट्स खाली दिले आहेत.
- विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावरून रान उठवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीसह सवाल विचारण्यात आला आहे.
- अच्छे दिन कधी येतील हाही प्रश्न एसीपी प्रद्युम्नच्या स्टाईलने सोशल मीडियावरून विचारला जातोय
- अच्छे दिनचे गाजर दाखवत सामान्य मतदाराला भुलवणाऱ्या भाजपाला या व्यंगचित्रातूनही लक्ष्य करण्यात आले आहे,
- अच्छे दिनचे गाजर दाखवण्यावरून भाजपाचे गाजर पार्टी असेही नामकरण करण्यात आले आहे.