दाऊदचे मुंबई पोलिसांशी साटेलोटे

By admin | Published: November 4, 2015 04:41 AM2015-11-04T04:41:16+5:302015-11-04T04:41:16+5:30

मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या

Sawatlote with Dawood's Mumbai Police | दाऊदचे मुंबई पोलिसांशी साटेलोटे

दाऊदचे मुंबई पोलिसांशी साटेलोटे

Next

बाली/मुंबई : मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या इशाऱ्यानुसारच काम करतात. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेऊन मला न्याय द्यावा, असे साकडे त्याने घातले आहे. मी दाऊदला घाबरत नाही; त्यामुळे मी दाऊद व दहशतवादाविरुद्धचा लढा सुरूच ठेवणार आहे, अशी पुस्तीही त्याने जोडली. इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर छोटा राजनला बाली पोलिस मुख्यालयातून कोठडीत हलविण्यात येत असताना त्याने पत्रकारांपुढे म्हणणे मांडले.
राजन म्हणाला, सरकार मला दिल्ली किंवा मुंबई कुठेही ठेवू शकते; परंतु माझ्यावर अन्याय व्हायला नको. मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. माझ्याविरुद्धचे सर्व गुन्हे धादांत खोटे असल्याचे सांगून भारत सरकारने मला न्याय द्यावा, असे तो म्हणाला.
दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्याचा डाव मुंबई पोलिसांतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कसा फसला, याबाबत माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी दोन महिन्यापूर्वी जाहीर वाच्यता केल्यानंतरही महाराष्ट्र सरकारकडून मात्र यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. सिंह यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपात तथ्य असल्यास चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी चौकशीबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या संदर्भातील चौकशी कुठवर आली यासंबंधी विचारणा करणारे अनेक मेसेज आणि फोन करूनही अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी आणि मुंबई पोलिस आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.

Web Title: Sawatlote with Dawood's Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.