म्हणे, आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते!

By Admin | Published: July 6, 2014 07:48 PM2014-07-06T19:48:09+5:302014-07-07T00:56:29+5:30

डॉक्टरांचा फंडा; नागरिकांची दिशाभूल

Say, Ayurvedic gold prashan was eliminated by demons! | म्हणे, आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते!

म्हणे, आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनाने भूतबाधा दूर होते!

googlenewsNext

अकोला : देवापेक्षा विज्ञानावर विश्‍वास ठेवणार्‍या खुद्द डॉक्टरांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान बालक ांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन दिल्यास भूतबाधा दूर होत असल्याचा प्रसार केला जात आहे. शहरातील एका डॉक्टरचा हा फंडा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान असून, या बाबीची गंभीर दखल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी घेतली आहे.
पुष्प नक्षत्राच्या मुहूर्तावर लहान बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरातील एका डॉक्टरने २७ जुलै ते २ मार्च २0१५ पर्यंत आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुवर्ण प्राशनाचे प्रचंड फायदे असल्याचे मनावर बिंबवल्या जात असल्याचे समोर आले. शून्य ते १२ वयोगटातील मुलांना सुवर्ण प्राशन दिल्यास त्यांची बुद्धी, बल, आयुष्य, वीर्य व वर्ण वाढत असल्याचा दावा केला आहे. यातही कहर म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांच्या अंधश्रद्धेला चालना देत सुवर्ण प्राशनामुळे लहान मुलांमधील भूतबाधा दूर होऊन पुण्याचा लाभ होत असल्याचा प्रसार केल्यामुळे संबंधित डॉक्टरांचे शिबिर वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
१0 रुपये नोंदणी शुल्क आकारून औषधी सेवनासाठी ४0 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. अवघ्या ४0 रुपयांत आयुर्वेदिक औषधीच्या सेवनामुळे भूतबाधा दूर होत असल्याच्या प्रसाराने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची सुशिक्षित डॉक्टरांकडूनच ऐशीतैशी होत आहे.
या गंभीर प्रकाराची महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून, ही नागरिकांची शुद्ध फसवणूक असल्याचे मनपाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Say, Ayurvedic gold prashan was eliminated by demons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.